संकट प्रसंगी केंद्राची साथ मिळत नसल्याने पेच

संकट प्रसंगी केंद्राची साथ मिळत नसल्याने पेच


मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः मुंबईसह राज्यभरात कोरोना कोविड या विषारी औषधाने कहर माजवीला आहे.  आरोग्य खाते कसोशीने निर्मूलन करीत असून वैद्यकीय अधिकारी जिव मुठीत घेवून बाधीत रुग्णावर उपचार करीत असल्याने सोयीसुविधा व यंत्र सामुग्री पुरविण्यासाठी राज्य शासनावर आर्थिक ताण पडतो आहे.  अशा संकटकाळी केंद्र सरकारची मिळावी तशी साथ मिळत नसल्याची खंत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.  तर महाराष्ट्राचे जिएसटी करापोटी केंद्र सरकारकडे सोळा हजार कोटी रुपया पेक्षा अधिकची रक्कम येणे असताना ही ती दिली जात नसल्याने कोरोना हटाव मोहिमेत आर्थिक चणचण भासत असली तरी कोरोना मुक्तीसाठी राज्य सरकार आरोग्य विभाग जिकरीने मुकाबला करीत असल्याने जनतेने लॉकडाउनचे पालन करुन सरकारला सहकार्य करावी असे अहवान ही मंत्री थोरात यांनी केले आहे.  
 दरम्यान कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असल्याने महसुलीकर वसूल होत नाही, त्यामूळे शासकीय खर्चावर निर्बध लागू करुन इतर खर्च वित्तविभागाची परवानगी घेतल्याशिवाय करु नये वित्तविभागातील प्रमुखाना आर्थिक निर्बध लागू केल्यांची माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.  व आर्थिक तुटी मध्ये केंद्र सरकारचे आर्थिक सहाय्य मिळत नसल्यामूळे पेच निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण ही वित्तमंत्री पवार यांनी केले. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या