कोरोना ग्रस्ताबरोबरच शासकीय कर्मचार्‍यानीही सावधगीरी बाळगावी

कोरोना ग्रस्ताबरोबरच शासकीय कर्मचार्‍यानीही सावधगीरी बाळगावी


पुणे (दै.लातूर प्रभात प्र.) ः मुंबई नंतर पुणे शहर व परिसरात कोविड १९ या विषाणुने कहर माजवीला असतानाही कोरोनाग्रस्ताची परिस्थिती केवळ डॉक्टरी उपचारामुळेच स्थिर असून अनेक रुग्ण उपचारानंतर घरी जात असले तरी कामगार मजूर यांनी पुणे येथून आपापले घर गाठले असल्याने आणि कांही लोक लॉकडाउन मध्ये अडकल्यामूळे ते आरोग्य विभागातील आधार केंद्रात किंवा झोपडपट्टीत आसरा घेवून थांबले असले तरी पुणे शहर सुनेसुने असे वाटते आहे.  तरी ही अनेकजन ये-जा करीत असल्यामूळे खबरदारी म्हणून लॉकडाउनचे पालन करणे गरजेचे वाटत असल्यामूळे शासकीय यंत्रणेसह पोलीस दक्ष असल्याचे दिसते. 
 लॉकडाउनमुळे जनतेसह अनेक शासकीय कर्मचार्‍याना घरीच बसून शासकीय कामे घरी बसूनच करावीत असे आदेश केल्यामूळे अनेक कर्मचारी घरबसल्याच शासकीय कामे करीत आहेत.  त्यामूळे बसबैठकीत कर्मचारी राबत असल्यामूळे वेगवेगळ्या रोगाला सामोरे जाण्याची भिती जाणवते, उद्भवते, त्यासाठी अशा या शासकीय कर्मचार्‍यानी बसबैठकीत शासकीय कमी करीत असताना मधूनच उठणे, फिरणे अशी सावधीरी बाळगावी यातूनच साधारण व्यायाम व रक्त अभिसरणात वाव मिळतो.  त्यासाठी घरबसल्या शासकीय सेवा करणार्‍या कर्मचार्‍यानीही लॉकडाउन मधील जनतेप्रमाणेच सावधगीरी बाळगावी असे अहवान सरकारने शासकीय मर्गदर्शक पुस्तीकेद्वारे केले आहे.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या