पोलीस व आरटीओ कर्मचार्यांची तापसणीसाठी नांदेडला पाठवली
भोकर/(सिद्धार्थ जाधव) : तालुक्यालगत असलेल्या महाराष्ट्र -तेलंगणा सीमे जवळ रहाटी चेक पोस्ट पार करून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशि संपर्क आल्याच्या संशयावरून तिन पोलीस अधिकारी ,नऊ कर्मचारी, दोन होमगार्ड , एक स्वयंपाकी व एक आरटीओ अधिकारी आणि दोन आरटीओ कर्मचारी अशा एकुण अठरा जणांना तापसणीसाठी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णांलयात पाठविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त तेलंगाणा मध्ये कोरोना चाचणी करून होम कोरोनटाइन केला गेलेला ट्रक चालक घरामध्ये न राहत सोबत एक क्लीनर घेऊन आपला आंब्यांने भरलेला ट्रक दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी तेलंगणा सीमेलगत असलेल्या तालुक्यातील राहाटी चेक पोस्ट पार करून महाराष्ट्रात प्रवेश केला आणि या दरम्यान या ट्रक चालक चा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तेलंगाणा पोलिसांना कळताच सदरील पोलीस रुग्णांच्या घरी गेले असता घरच्यांनी सांगितले की हा रुग्ण ट्रक घेऊन महाराष्ट्रात आंबे घेऊन गेल्याची माहिती दिली तेव्हा तेलंगणा पोलिसांनी सदरील रुग्णाचा फोन लोकेशन घेतले असताना हा ट्रक दिनांक १८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात आंबे खाली करून कांदे घेऊन पुनः तेलंगणा मध्ये येत आहे असे कळाले तेव्हा तेलंगणा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवलं की ह्या नंबर चा ट्रक घेऊन आलेला ट्रक चालक हा कोरोना पॉझिटिव्ह आहे असे सांगताच काही तासातच हा ट्रक महाराष्ट्र - तेलंगणा सीमे जवळ आला आणि तेलंगणा पोलिसांनी या ट्रक चालक व सोबत असलेल्या क्लीनर ला ताब्यात घेतलं ही पूर्ण माहिती कळताच भोकर येथील पोलीस निरीक्षक विकास पाटील तात्काळ घटना स्थळी पाहणी केली व पूर्ण राहाटी पोस्ट चेक सेनिटायझर करून घेतलं व या पूर्ण घटना घडल्या प्रसंगी नाक्यावरील कर्तव्य बाजावनार्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशि संपर्क आल्याच्या संशयावरून तिन पोलीस अधिकारी ,नऊ कर्मचारी, दोन होमगार्ड , एक सोयपाकी व एक आरटीओ अधिकारी आणि दोन आरटीओ कर्मचारी अशा एकुण अठरा जणांना स्वरक्षणार्थ तापसणीसाठी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णांलयात पाठविण्यात आले असल्याची अधीक्रत माहिती भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी दिली.