तोंडावर मास्क न लावणार्या मंत्र्यावर कोण कारवाई करणार
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) : देशासह महाराष्ट्रात कोरोना कोविड १९ रोगाचा फैलाव होवू नये म्हणून जे नियम अटी कार्यान्वीत आहेत, त्याची अमलबजावणी महाराष्ट्रातील मंत्री, प्रमुख अधिकारी, करत नसल्याचे दिसून येत आहे.
स्वतःची प्रसिध्दी व्हावी, स्वतःचा चेहर दिसला पाहिजे, असे मंत्री, अधिकारी, बिनदास्त प्रमुख अधिकारी बैठकीत खुलेआम तोंडावर मास्क न लावता चर्चा करीत असल्याचे दिसत आहे. कांही मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे आरोग्य प्रशासन हादरले आहे. कोरोना संसर्गजन्य रोग गतीने फैलावत आहे.
प्रसिध्दीची हौसी असलेल्या अशा मंत्र्यांना कोण आवरणार हेच प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. जबाबदारच असे वागत असतील तर सामान्य नागरीकानी काय आदर्श घ्यावा, असी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना फैलाव रोखण्यासाठी खुप पर्यत्न करीत आहेत, पंरतू त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री असे मोकाट नियम धाव्यावर ठेवून वागत असतील तर त्यांना कोण रोखणार अशी चर्चा अधिकारी वर्गातून होत असून बेजबाबदार मंत्री, अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.