लातूर जिल्ह्यात १५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

लातूर जिल्ह्यात १५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह


लातुरात १०, उदगीर ३, अहमदपूर २ तर उदगीरमध्ये ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू


   लातूर (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण ६८ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  ०३ व्यक्तींचे अहवाल खपलेपलर्श्रीीर्ळींश आले आहेत. 



पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या  ०४ व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील ०३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहमदपूर येथिल ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे.
१२ रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी
 लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७,   उपजिल्हा रुग्णालय निलंगा १ व उपजिल्हा रुग्णालय उदगीर ४ अशा एकूण १२ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव ३, मोतीनगर १, जुनी कापड लाईन २ व भुसार लाइन १ असे ७ रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून १ तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी  ३ व नोबेल कॉलनी १  असे ४ याप्रकारे लातूर जिल्ह्यातून १२ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या