मराठी पत्रकार संघातर्फे गौरवपुर्ण सत्कार

कोविड मुक्ती लढ्याचे प्रणेते जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचा


राज्य मराठी पत्रकार संघातर्फे गौरवपुर्ण सत्कार



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूरचे कर्तव्य दक्ष, कार्यक्षम जिल्हाधिकारी तथा कोरोना कोविड मुक्ती लढ्याचे प्रणेते जी श्रीकांत यांचा त्यांच्या कार्यकुशलता आणि तत्परसेवेची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने गौरव पत्र देवून सन्मान व सत्कार करण्यात आला. 


जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रथमतः सायकलस्वारीतून लातूरकरांच्या समस्या जाणून घेतल्या, शहरी भागातील मुख्य चौक वसाहतीत महिला पुरुषांसाठी शौचालय, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूकीस अडथळा ठरु नये यासाठी पार्कीगंची व्यवस्था, गंजगोलाईतील अतिक्रमन मोहिम, लातूर शहराला नियमित पाणी पुरवठा व पाणी टंचाई निवार्‍याचे कार्य, शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्गात शिस्तीचे पालन वगैरे, लोकहितावत कामासह सर्वांगीण विकासाची कामे एक शासकीय पालकसेवक म्हणून जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल्याने त्यांचा हा सत्कार नाविन्यपूर्णच म्हणावा.
 कोरोना कोविडचा प्रार्दूभाव वाढला त्यावेळी लातूर जिल्हा कोविड मुक्त राहावा, टाळेबंदी व शारीरीक अंतराचे पालन व्हावे, करावे यासाठी दक्ष राहून सातत्याने मार्गदर्शन करीत स्वतः सहभागातून कोविड निर्मूलनाच्या लढाईत प्रणेते म्हणून कार्य केले, करत आहेत.  व मुंबई पुणे येथून कोविडची लागन झालेले नागरीक शहर गावात येवू नये यासाठी ऍन्टी कोविड फोर्स (पोलीस मित्र)  निर्माण करुन कोविडची लढाई यशस्वीपणे करीत असल्याने जी श्रीकांत यांचा राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्‍हदय सत्कार करण्यात आला, या प्रसंगी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, जिल्हासंघटक महादेव डोंबे, इलेक्ट्रॉनीक्स मिडियाचे जिल्हाध्यक्ष नितिन बनसोडे, नानासाहेब कांबळे, कोषाध्यक्ष अरुण जे कांबळे, सल्लागार, आदीनी सन्मान केला आहे. 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या