सत्तेचा बाज ग्रामपंचायतीतही कशासाठी !
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड प्रादूर्भाव आणी निर्मूलनासाठी टाळेबंदी व शारीरीक अंतराचे निर्बध लागू केल्याने महाराष्ट्रातील दीड हजारावरील ग्रामपंचायतीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या. त्यामूळे संबधीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियूक्त करणे व प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारीच नियूक्तीवर घेणे घटनात्मकदृष्ट्या योग्य व न्यायीक असले तरी सत्तापिपासू राजकारणी लोकप्रतिनिधी हे ग्रामपंचायतीतही सत्तेचा बाज आपलाच असावा यासाठी राज्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यानी ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपत आह तिथे सरपंचाऐवजी त्याची पत्नी व ज्याठिकाणी पत्नी सरंपच आहे त्याठिकाणी पती प्रशासक म्हणून नियूक्त करावा असा अजव आदेश जारी केल्याने सत्तेची बाज कांही केल्या जात नाही अशीच राजकीय वर्तूळात चर्चा होत असताना दिसते आहे.
महाराष्ट्रात सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता आहे. ग्रामपंचायतीही त्यांच्याच ताब्यात असल्याने पती सरपंच असेल तर पत्नी प्रशासक आणी पत्नी सरपंच असेल तर पती प्रशासक ही अजब तर्हा पूरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जोपासू पाहत असेल तर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचेप्रमाणे विरोध डावलून वटहुकूम जारी करुनच हा निर्णय जनतेवर लादावा लागेल अशी संतापजनक चर्चा होताना दिसते आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्वाधीक ग्रामपंचायतीच्या मुदत संपूष्टात येते आहे. त्यावरुन सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहील अशी ही चर्चा होताना दिसते आहे.