संपादकीय...
झपाटलेलाच आंदोलक?
आंदोलन, आंदोलक, हा कांही बाजारातला भाजीपाला नाही. आंदोलनला इतिहास आहे. भारत स्वतंत्र चळवळीचा इतिहास, स्त्रिमूक्ती चळवळीचा इतिहास, मानवमूक्ती चळवळीचा इतिहास, लोकशाही, सार्वमतीय सामाजीक न्यायाची चळवळ या सर्व आंदोलनाचा विचार केला तर आज कोणी तरी ते आंदोलनकर्ते कोठे गेले हा प्रश्न अनाठाई, बिनडोक असाच वाटतो. कारण आंदोलन हे सामाजीक हिताचेच, सर्वांगीण हित व विकासाचे महत्व प्राप्त करणारे असते. क्षणीक प्रश्नावरही आंदोलने होत असतात, होत आहेत, पंरतू ती व्यापक नाहीत, क्षणीक आहेत. अशा प्रश्नाचा राष्ट्रीय महत्व प्राप्त करणे हेतूने कोणी हे आंदोलनकर्ते आज कोठे गेले असा प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या मेंदूचीच कोविड १९ निर्मूलन रुग्णालयात तपासणी करावी लागेल अशीच चर्चा होताना दिसते आहे. ती अवास्तव ठरु नये अशीच चर्चा होताना दिसते आहे.
कोरोना कोविड या विषारी विषाणू रोगाने सार्या जगाला वेढलेले आहे. भारतात तर थैमान घातले आहेच पण महाराष्ट्राला जेरीस आणले आहे सारा समाज या कोरोना कोविड विरोधात लढतो आहे. टाळेबंदीत तोंडाला कुलूप लावून जगतो आहे. पण राजकारणी लोक मात्र कांहीतरी निमित्त करुन एकमेकावर आगफाकड करुन राजकारण करताना दिसतात ही बाब सद्यःस्थितीला शोभत नाही अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. महाराष्ट्रात शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मित्रपक्षासह सरकार कार्यरत आहे. सरकार चालविणे सोपे नसते हे सत्ताधारी व विरोधकानीही चांगले ज्ञात आहे पण विरोधी पक्षनेत्यनी कोरोना कोविड प्रश्नावरुन हे आंदोलनकर्ते कोठे गेले असा सवाल करुन स्वतःचेच हासू करुन घेत आहेत की काय अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
आंदोलन म्हटले की स्वतंत्र भारताचे आंदोलन समोर येते. ते अहिंसक होते, इतरसर्वच आंदोलने अहिंसकच होत गेली. पंरतू आंदोलन म्हणजे काय असते याची जरब खरी तर महाराष्ट्रातील दलित-संवर्ण वादातून स्पष्ट होत गेली. राखीव जागा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, शिष्यवृत्ती वाढ आंदोलन, मंडल आयोग अशा अनेक प्रश्नाची धग दलित पँथर, युक्रांद, दलित मुक्ती सेना, अशा लढाऊ संघटनानी सरकारला दाखवून दिली. आंदोलने कशी असतात घोषणा व फलकबाजी कशी असते हे पँथरने दर्शविले, आणी आंदोलनाचा खरा संदर्भ शासनाला कळाला तेंव्हापासून कॉंग्रेस, सेना, भाजपाने आंदोलने करणे सुरु केली. ती पँथरचीच देणगी असावी असे म्हटल्यास वावगे ठरु नये त्यात गुपचूप कसा दगा द्यावा आणी आंदोलन यशस्वी करावे यात पटाईत असलेले प्रा. जोगेंद्र कवाडे आजही विधान परिषदेत आहेत. त्यांच्याकडून माहिती न घेता केवळ सत्ता हाती नाही म्हणून घायाळ झालेल्या हरिणी सारखे एका भैरसशाने आंदोलनकर्ते कोठे गेलेत असा सवाल करावा म्हणजे आश्चर्यच वाटते.
कोरोना कोविडच्या धास्तीने राज्य सरकारसह केंद्र सरकारने टाळेबंदी जाहिर केली. उद्योगधंदे बंद पडले, कामगार, मजूर बेकार झाले, अशाना गाव जवळ करताना हालअपेष्ठा सोसाव्या लागतात. अनेकाना मरण स्विकारावे लागले. त्यासाठी शक्य त्या सोयी, सवलती केंद्र व राज्य सरकार देत आहे, पंरतू राजकारण म्हणून भाजप चे लोकप्रतिनिधी महाराष्ट्र सरकारला विरोध करताना दिसत असून तेंव्हाचे आंदोलनकर्ते आज कोठे गेले आहेत अशी प्रश्नात्मक चर्चा करताना दिसत आहेत पण प्रश्नकर्ते आज कोठे आहेत, केंद्रा संदर्भात न बोलता केवळ महाराष्ट्रापूरतीच भाषा का करीत आहेत अशीच कुजबूज सर्वत्र होताना दिसते आहे. त्यामूळे अज्ञानात, आनंद घ्यावा अशीच कृती होताना दिसते आहे. ती वास्तव असावी असेच वाटते.
कोरोना कोविडचा प्रश्न सर्वानाच भेडसावतो आहे. तो जीवघेणा असाच आहे, अशा विषाणूचा पाडाव करणेसाठी सर्वसामान्य जनता, कामगार, मजूर, भूकेली जनता स्वतः होवून टाळेबंद होवून कोविडच्या विरोधात युध्दस्थ मुकाबला करीत असताना भाजपा मात्र आंदोलनाची भाषा करुन कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादीला छेडीत आहे ही बाब सहनशिलतेच्या पलिकडचीच ठरावी अशीच चर्चा होताना दिसते आहे. कारण कोरोना कोविडवर औषधी लस उपलब्ध नसली तरी आरोग्य विभाग, शासन उपजत औषधीचा वापर करुन कोविड लढाईत सरस ठरत असताना भाजपा मात्र दुःखावर मलमपट्टी न करता कपली काढण्याचाच प्रयत्न करते आहे त्यामूळे सारेकांही सत्तेसाठीचे मृगजळ असावे अशीच चर्चा होताना दिसते आहे.
सपाटलेले आंदोलक हे त्यांच्या न्याय मागणी पदरात पडल्याखेरीज गप्प बसत नाहीत हे नामांतर आंदोलक, मंडळ आयोग समर्थक, शिष्यवृत्तीधारक आंदोलक आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, समिती आंदोलक, राममंदिर आंदोलकानी दाखवून दिलेले असताना केवळ कोरोना कोविड, कामगार, मजूराचा प्रश्न समोर करुन केवळ महाराष्ट्र सरकारला जाब विचारणार्यानी केंद्र सरकारला बाजूला ठेवून आंदोलक कोठे गेलेत असा प्रश्न करावा म्हणजे आपलं ते बाबा आणी दुसर्याचं कारटं अशीच अवस्था भाजपाची झाली असावी त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याना बदनाम करण्याचेच षढ्यंत्र नसावे की काय अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. मात्र झपाटलेला आंदोलक हा हाती कांहीतरी लागल्याविना स्वस्त बसत नाही, असे शेलार कितीही आले बोलले तरी कांही फरक पडत नाही, अशीच कुजबूज होताना दिसते आहे.