पंडीत जवाहरलाल नेहरु दवाखान्याचे पांडीत्य गेले कोठे?
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहर हे उद्योग, व्यवसाय, व्यापार, शैक्षणीक क्षेत्रातील नामांकित असे शहर आहे. वैद्यकीय व्यवसायही बर्यापैकी चालतो. शासकीय रुग्णालयासह लातूर नगर परिषद कार्यरत असल्यापासून नगर परिषदेचा मुख्य दवाखाना व इतरत्र कांही भागात दवाखाने सुरु होते. त्यातीलच मुख्य दवाखाना हा जूने लातूर परिसरातील पटेल चौक, नांदगाव वेस मधील सूरत शहावली दर्ग्या समोरील दवाखाना ही ओळख महत्वाची ठरते.
लातूर शहरातील या मुख्य दवाखान्याचे नांव पंडीत जवाहरलाल नेहरु असे ठेवण्यात आले. लातूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णही याच दवाखान्यात उपचारासाठी येत असत. दिवंगत विलासराव देशमूख यांनी भरभरुन विकास केला, आणी तद्नंतर सत्तांतर झाले. लातूरचे पालकमंत्री भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर हे झाल्यानंतर त्यानी याच दवाखान्याची कायापालट करणेसाठी नवीन बांधकाम, सुविधा तंत्रयोजनासाठी निधी उलब्ध करुन बांधकाम सुरु केले अशी चर्चा आहे. जूनी इमारत पाडली गेली, आणी पुन्हा संत्तातर होवून शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले आणी लातूर महानगरपलिकेचा हा दवाखाना पडीक दवाखाना झाला अशीच चर्चा होताना दिसते आहे.
लातूर मनपाचा हा दवाखाना आजघडीला असून नसल्यासारखा आहे. दवाखाना उद्ध्वस्त असून केवळ एक ओपीडी कक्ष असून आलेल्या रुग्णाना इतरत्र पाठविले जाते. दै.लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता, कायम पदावर असलेले डॉक्टर, दवाखान्यात कधी येता तर कधी येत नाहीत, रुग्ण उपचार घेण्यासाठी वेळेत आला असताना ही, तेथील शिपाई डॉक्टर नाहीत, उद्याला या, वेळ संपला, चला बाहेर जा, असा दम देतो, दवाखान्यात कांही प्रमाणीकपणे काम करत असल्याचे कर्मचारी दिसून आले पंरतू घरी बसून पगार घेणार्याची संख्या जास्त दिसून आली. नियमीत मनपा डॉक्टर कोण आहेत हे कोणालाच माहित नसून दवाखाना परिसर हा स्मशानभूमी पेक्षाही समशानवत झाल्याचे दिसते आहे. मनपा आयूक्त व मनपा लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
आजघडीला कोरोना कोविड निर्मूलनासाठी रुग्णालये निर्माण होत असताना, लातूर मनपाचा दवाखाना अडगळीत कसा ? अशी चर्चा होत असून जुनी इमारत पाडल्याठिकाणी आजघडीला बांधकाम ठिकाणी पिलर उभे असल्याचे दिसते. या सदरील बांधकामाचा ठेकेदार कोण आहे, त्यास किती दिवसाची मुदत दिली आहे. हे प्रश्न गुलदस्त्यात असले तरी लातूर महानगरपलिकेचा पंडीत जवाहरलाल नेहरु दवाखान्याचे पांडित्य कोठे गेले अशीच उलटसूलटच चर्चा होताना दिसते आहे.