लातूर 240 पैकी 164 निगेटिव्ह 19 पॉझिटिव्ह 22 Inconclusive 35 प्रलंबित

लातूर 240 पैकी 164 निगेटिव्ह 19 पॉझिटिव्ह 22 Inconclusive 35 प्रलंबित


     लातूर (जिमाका) :  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 59 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत .


दिनांक 04.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 25 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 07 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


       विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 03 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज एका 65 वर्ष वय असलेल्या रुग्णास दमा व निमोनिया हे आजार होते त्यांचा उपचारादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या