राज्य पत्रकार संघाकडून लक्ष्मीरमण लाहोटी यांचा सन्मान

राज्य पत्रकार संघाकडून लक्ष्मीरमण लाहोटी  यांचा सन्मान 



       लातूर : राज्यात शैक्षणिक  क्षेत्रात शिक्षण पंढरी म्हणून  नावलौकिक असलेल्या  लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेने  सामाजिक बांधीलीकी दायीत्व  म्हणून  कोरोनाच्या  संकट काळात ५०० गोर गरीब लोकाना  अन्नधान्य किट वाटप  केले तर  पोलिस,पत्रकार,बँक,महापलिका  येथील अत्यावश्यक सेवा बजावनारे अधिकारी,कर्मचारी याना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दयानंद फार्मसी च्या वतीने सॅनिटायझरची निर्मिती करून पाच हजार बॉटल सॅनिटायझर मोफत वाटप केले असुन कला महाविद्यालयाच्या वतीने सात हजार मास्क वाटप केले तर बाहेरगावी अडकलेले ८० विद्यार्थी यांना अन्नधान्य किट देऊन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केल्याबद्दल  संस्थेच्या या  सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई जिल्हा शाखा, लातूरच्या वतीने ’कोरोना योद्धा’  म्हणून दयानंद शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव रमेश बियाणी यांचा गुरुवारी  संस्थेच्या कार्यालयात सन्मान  गौरव पत्र,शाल श्रीफळ देऊन सन्मानीत  पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  अशोक देडे , जिल्हा कार्याध्यक्ष  रघुनाथ बनसोडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून दयानंद शिक्षण संस्था लातूरचा उल्लेख केला जातो  महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक निर्णय घेण्या अगोदरच  दयानंद शिक्षण संस्थेमध्ये  ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरु करुन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. त्याची दखल राज्य सरकारच्या बैठकीत घेतली गेली असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत कोरोनाच्या संकट  काळात  अत्याधुनिक दर्जाचे स्मार्ट बोर्ड आणून आज या संस्थेमध्ये ऑनलाइन टीचिंग  सुरू केले.  कोरोनाच्या महामारी मध्ये विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून अत्याधुनिक दर्जाच्या सॅनिटायझर मशीन आणून महाविद्यालयात निर्जंतुकीकरण केले आहे हे विशेष आहे.
        संस्थेच्या माध्यमातून  समाज उपयोगी कामास प्राधान्य देणार:लक्ष्मीरमण लाहोटी
संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी येणार्‍या काळात संस्थेच्या माध्यमातून जे जे समाजोपयोगी काम करता येईल ते काम करण्याचा मानस यावेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले
 या सत्कार सोहळ्या प्रसंगी  संस्थेचे सचिव रमेश बियाणी, दयानंद कला महाविद्यालयाचे प्रभारी  प्राचार्य एस.पी. गायकवाड, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जयप्रकाश दरगड,दयानंद वानीज्य महाविध्यालयाचे प्राचार्य  श्रीराम सोलून्के,  उपस्थित होते.
         यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, जिल्हा संघटक महादेव डोंबे , कोषाध्यक्ष अरुण जे. कांबळे, विनोद चव्हाण, अमोल घायाळ , उपाध्यक्ष सोमनाथ स्वामी, नितीन भाले, हरून मोमिन, संतोष सोनटक्के उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव डोंबे यांनी प्रास्ताविक रघुनाथ बनसोडे यांनी मांडले. याप्रसंगी अशोक देडे यांनी मनोगत व्यक्त केले  तर  आभार अशोक हनवते यांनी मानले.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या