टाळेबंदी पूर्णतः उठवा किंवा कडेकोट बंद करा

टाळेबंदी पूर्णतः उठवा किंवा कडेकोट बंद करा



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः अधिकार आहेत म्हणून कोरोना-कोविड निर्मूलनाचे निमित्त करुन गरज नसतानाही जनतेला टाळेबंदीत कोंडवून ठेवू नये.  टाळेबंदी शिथील केली काय आणी उठविली काय यामूळे कोरोना-कोविड फैलाव रोखत नाही टाळेबंदी तर तो अधीक घट्ट होवून शिथील होताच त्याचा भपका उडतो त्यामूळे कोरोनाचा फैलाव आणी टाळेबंदी याची सांगड घालणे मानवी हक्कावर घाला घालणारे असून टाळेबंदी पूर्णतः उठवा किवा कडेकोट बंद म्हणजे शहरी-ग्रामीण भागातील गल्ली बोळातील दोन्ही बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त लावून माणसांची नाकेबंदी करावी असा सूर नागरीकातून व्यक्त होताना दिसतो आहे.  याकडे गांभीर्याने पाहावे असेही बोलले जाते आहे.
कोरोना-कोविड १९ या विषारी विषाणू महामारी रोगावर प्रतिबंध करणारी औषध लसच उपाय करु शकते टाळेबंदी नव्हे अशीच चर्चा सर्वत्र होत असून टाळेबंदीत अडकलेल्या स्त्रि-पुरुषाबरोबरच पोलीस कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचार्‍याना वेठीस धरुन त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अशी भावना व्यक्त होताना दिसते आहे. 
आजघडीला जी कारोना -कोविड रुग्णाची संख्या वाढते आहे ती सुप्त अवस्थेतील किंवा भितीपोटी आणी होत असलेला रोग दडवून ठेवण्याच्या प्रयत्नातूनच उघड होत असल्याने सर्वसामान्य जनतेला कोरोना-कोविड निर्मूलनाच्या नावाखाली टाळेबंदीत डांबून न ठेवता ज्यांच्या-त्यांच्या वैयक्तीक जबाबदारीवर मुक्तपणे राहू द्यावे किंवा टाळेबंदी वाढविली तर बाहेर पडणार्‍या सर्वानाच शिक्षा न देता चौकशीत विनाकारण, किंवा गरजनसताना तो बाहेर पडला आहे याची खातरजमा करुनच दंडात्मक कारवाई करावी आणी दंडूका कारवाईवर पाबंदी आणावी अशीही चर्चा होताना दिसत आहे. 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या