अभिताभ बच्चन, अभिषेक बच्चन कोरोना पाॕझिटिव्ह
मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमिताभ बच्चन ह्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांना नेमकं कशामुळे दाखल करण्यात आलंय, यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात अचानक ते रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे, विविध चर्चा होत असतानाच अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली.
मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे असेही स्वतः ट्विट करुन सांगितले आहे.