बदनाम राजकारणामूळे टाळेबंदी
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः केंद्रात बहुमतावर भाजपा सरकार कार्यरत आहे. तर महाराष्ट्रात भाजपा विरहीत सरकार आहे. कोरोना-कोविड या संसर्ग रोगामूळे देशावर टाळेबंदी, अंतरनियमाचे निर्बंध लादले गेले, सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधी तूपाशी तर कामगार, मजूर, शेतमजूरावर उपासी राहाण्याची वेळ आली. हाताला काम नसल्याने हातावर पोट असलेली जनता सैरभैर झाली त्यात कोरोना-कोविड रोगाचे राजकारण करुन विरोधी पक्षानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर बदनामीचे राजकारण सुरु झाले आणी कामगार, मजूराचा प्रश्न बाजूला फेकला गेला हीच संधीसाधून विरोधकाना शह देण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी पून्हा टाळेबंदी जारी करुन कॉंग्रेसह जनतेला वेठीस धरले अशीच चर्चा होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात शिवेसना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार अस्तित्वात असून घटक पक्ष असलेली कॉंग्रेस मंडळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असून निर्णयप्रक्रियेवर बोट ठेवून ठाकरे याना कोंडीत पकडत आहेत तर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सरकार शरद पवारच चालवितात उध्दव ठाकरे हे नावाचे धनी आहेत म्हणून शिवसेनेवर टीका करीत असतात पंरतू तर्कवितर्कातून जनतेसाठीच सारे कांही आहे म्हणून टाळेबंदी शिथील तर कोठे कठोर करुन जनतेला झूलवित असल्यामूळे भाजपा-कॉंग्रेस-सेना-राष्ट्रवादीच्या राजकारणामूळे आणी भाजपा कॉंग्रेसमधील केंद्रीयपातळीवरील बदनाम राजकारणामूळेच टाळेबंदी लागू करुन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी हम करे सो कायदा म्हणून कामगार-मजूराना वार्यावर सोडले अशी टीका सर्वत्र होत असून टाळेबंदी लागू करुन देशाची आर्थीक घडी मजबूत होत नाही तर अर्थव्यवस्था खुली झाली आणी बाजारपेठ सर्वसमावेश झाली तर टाळेबंदीतला अर्थ सर्वमान्य होईल अन्यथा बदनामीचे राजकारण सुरुच राहील आणी टाळेबंदी जनतेच्या मानगुटीवर बसेल असे स्पष्ट मत अजित कवटकर मुंबई यानी व्यक्त केले आहे.