मराठवाड्यातील अवैद्य वाळू उपसा कोण रोखणार 

मराठवाड्यातील अवैद्य वाळू उपसा कोण रोखणार 
       लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर जिल्ह्यातील देवणी, जवळगा, हिसामनगर, रेणापूर परिसरातील अवैद्य वाळू उपसा चर्चिला गेला पंरतू लातूर नजीकच अवैद्य वाळू उपसा करुन वाहन घेवून जाताना सोळा वहाने पकडण्यात आली तीत वाळू होती की नाही याचे स्पष्टीकरण महसूल विभागाने केले नाही.  मराठवाड्यातील गंगाखेड, नंादेड, परभणी, हिंगोली, लातूर येथे नेहमीच गौण खणिज्ये-वाळू उपसा होत असतो परवा वसमत येथील वाळू उपसा प्रकरण गाजले अशा अनेक प्रकरणावर दै.लातूर प्रभातने वृतांकन केलेले आहे पण अवैद्य वाळू उपसा रोखला जात नाही.  यातील गौडबंगाल काय आहे अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 
     गौण खनिज्ये वाळू उपसा करणारे कोण आहेत त्यांचे पाठीराखे कोण आहेत, त्यांना राजकीय नेत्याची साथ आहे की स्थानीक जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभते आहे असे असेल तर मराठवाड्यातील अवैद्य वाळू उपसा कोण रोखणार असा सवालही उपस्थित केला जातो आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या