लातूरच्या गुळमार्केट चौकातील गटारीचे घाण पाणी लाजसोडते तेंव्हा !

लातूरच्या गुळमार्केट चौकातील गटारीचे घाण पाणी लाजसोडते तेंव्हा !


      लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहरातील गुळमार्केट चौक हा आडतबाजार-भाजी मार्केटचे केंद्र स्थान आहे.  व्यापारी विभाग, आडत बाजार, गुळमार्केट, भाजी मार्केट आणी शेतकरी वस्तीगृह याच चौकात असून याच हमरस्त्यावर सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचा अर्धपूतळा आहे.  या पुतळ्या समोरुनच गटार वाहते, हनुमान चौकापासूनचे वहाते पाणी याच गटारीतून वहाते या गटारीचे अर्धवट काम झाले. त्याच गटारीतील घाण पाणी स्क्रॅप मार्केटपर्यंत रस्त्यावरुन जाते पण त्यामूळे रस्त्यावर, चौकात घाण पाणी वहातूकीला अडथळा, घाण कचरा पाणी साचल्याने दुर्गंधी वाढली असून हे रस्त्यावर आलेले नालीतील घाण पाणी साचल्याने दुर्गंधी वाढली असून हे घाण पाणी म्हणजे रोगराईला आमंत्रणच अशी अवस्था झाली असून गटारीतील पाणी बेवारस असल्याने या गटारीतील पाणीच लाज सोडते आहे आणी लाज वाटत असल्याने ये जा करणार्‍याना दुर्गंधी देवून सावध करीत असल्याने दिवंगत सहकारी महर्षी ही अर्धपूतळ्यातून पाण्याकडें पाहत स्तब्ध झाले, होत असतील अशी चर्चा होताना दिसते आहे. 


      विशेष म्हणजे याच चौकातून बाहेरगावाहून येणारे शेतकरी, व्यापारी व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, आडत कामगार ये जा करीत असल्याने ही दुर्गंधीत गटारीतील पाणी आरोग्याला घातक ठरत असून बेवारस गटारीतील पाणीच लाज सोडून जसे आहे त्या परिस्थितीत तूंडूंब भरुन थांबलेले असल्याने ये जा करणारे स्त्रि, पुरुष हे तोंडाला बांधूनच प्रवास करताना दिसतात त्यात ये-जा करणार्‍या वहानाची गर्दी असल्यानेही महिला पुरुषाना कांहीवेळ रस्त्यावर, चौकात गटारीतील घाण पाण्यात थांबावे लागते, त्यामूळे गटारीतील घाण पाण्याची लाज कोण राखील काय अशीही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. विशेष म्हणजे या चौकात गटारीतील घाण पाणी रस्त्यावर आल्याच्या ठिकाणी वहातूक शाखेचे पोलीस कर्मचारी सेवा बजावत असताना त्यांना खुप अडचणीला तोंड द्यावे लागते, दै. लातूर प्रभातचे प्रतिनिधीने पोलीस कर्मचार्‍याना विचारले असता, घाण पाण्यातून वहान जात असताना पाणी अंगावर येत असते, कधी कधी आम्हाला अंगावरील ड्रेस दिवसातून दोनवेळा बदलावे लागते, नौकरी आहे करावी लागते असे दबक्या आवाजात सांगीतले. या बाबत लातूर मनपा कार्यालयास कळविले आहे पण त्याना कधी जाग येईल देव जाणे. या प्रभागाचे नगरसेवक यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. यापुर्वी ही दै. लातूर प्रभात मधून वृत्तांकन केले होते. पण कुंभकरण लातूर मनापाला जाग कधी येईल अशी चर्चा होताना दिसते आहे.



वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या