आ.अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस मुख्यमंत्री होण्यासाठीच साजरा
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः औसा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहीलेले आ. अभिमन्यू पवार याचा वाढदिवस काल थाटामाटात साजरा झाला. निलंगा, औसा, लातूर, उदगीर,रेणापूर सह मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्त्याची वृत्तपत्रातून शुभेच्छा जाहिराती देवून वाढदिवस साजरा केला तर अनेक हितसंबधी वृत्तपत्रातून लाखो रुपयाच्या जाहिराती छापून आ. अभिमन्यू पवार यानी आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे, हे विशेष लक्षणीय दिसत असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
आमदार अभिमन्यू पवार हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ परिवारातील असून विधानसभा निवडणूकी दरम्यानच्या प्रचारासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यंाचेसह केंद्रीय नेत्यानी त्याच्या विजयासाठी सभा घेतल्या होत्या त्यामूळे त्याचा विजय निश्चित मानला जात होता. आजघडीला ते आमदार असले तरी अवाढव्य खर्च करुन जाहिरात होर्डीग्ज, वृत्तपत्रीय जाहीराती देवून वर्चस्व दाखविण्याचा मार्ग म्हणजे उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठीची चुणूक यातून दिसते आहे अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे वाढदिवसा निमित्ताने जाहिराती, होर्डीग्ज मधून अवाढव्य खर्च करुन वर्चस्व दाखविण्यापेक्षा हाच खर्च कोरोना-कोविड बाधीत रुग्णावर आणी त्यांच्या कुटूंबीयाना मदत करुन आ. अभिमन्यू पवार याना वाढदिवस साजरा केला असता तर नाविन्यपूर्ण इतिहास ठरला असता अशीही चर्चा होताना दिसते आहे.
आ.अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस मुख्यमंत्री होण्यासाठीच साजरा
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, खालील मार्गावर ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...