लातूर 136 पैकी 107 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह 13 Inconclusive

लातूर 136 पैकी 107 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह 13 Inconclusive


     लातूर (जिमाका) :  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 50 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहायक प्राध्यापक डॉ. बालाजी पुरी यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून 65 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 27 रुग्ण दाखल असून 07 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 38 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. 


आज तीन रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 02 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते एक रुग्ण 13 दिवस व्हेंटिलेटरवर होता व त्या रुग्णास मधुमेह हा आजार होता व दुसरा रुग्ण 12 दिवस अतिदक्षता विभागात होता व एका रुग्णाची प्रकृती स्थिर होती त्याला कुठलाही आजार नव्हता अशी माहिती कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


लातूर जिल्ह्यात आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 402, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 175, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 213 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19.


आज 7 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या