लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंदे

देशी दारु विक्री जोरात



       लातूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः लातूर शहराचा नावलौकीक हा विकसीत शहर, शैक्षणीक क्षेत्राचे माहेरघर आणी कर्तबगार, पारदर्शक अधिकारी-लोकप्रतिनिधीचे शहर अशी ओळख आहे.  लातूर जिल्हानिर्मितीनंतर गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, ग्रामीण, विवेकानंद चौक अशी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आणी लातूरची कायदा व सुव्यवस्थाच कोलमंडली अशीच आजची परिस्थिती दिसते आहे.  हे पोलीस अधिकारीही नाकारु शकत नाहीत. 


       खून, दरोडे, लूटमार, तंटेबखेडे, वहानचोरी, महीलाचे दागीणे हिसकावणे असे रेाजचेच प्रकार असतात तक्रार नोंदविणे, तक्रार मागे घेणे या फिर्यादी, आरोपीकडून पैसे उकलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम पेालीसाकडून होत नाही असे लोकच बोलतात त्यामूळे दाद कोणाकडे मागावी आणी तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्‍न भेडसावीत आहे. 
लातूर शहराच्या मध्यवस्तीत व उच्चभ्रू वसाहत असलेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्‍वभेधी पूर्णाकृती पूतळ्यासमोरच शिवाजीनगर पोलीस ठाणे कार्यरत आहे.  याच शिवाजीनगर पेालीस ठाण्याच्या हद्दीतच देशीदारु दुकानासमोर-बाजूला इतर ठिकाणी विनापरवाना अवैद्य दारु सर्रासपणे विकली जाते.  देशी दारु दुकानाना वेळेच बंधन असल्याने वेळेपूर्वी, वेळेनंतर आणी दुकान बंद असते त्या दिवसी एखाद्याला दोनशे रुपये देवून अवैद्य दारु विक्री करण्यास लावले जाते, कोणा प्रामाणीक पोलीसानी पकडून खटला भरला तर त्याचे आयूष्य बरबाद होऊ शकते अशाना जबाबदार कोण अशीही चर्चा होताना दिसते आहे. 
      एखाद्या नागरीक किंवा पत्रकाराने तक्रार केली किंवा फोनवर अवैद्य धंदे देशीदारु विक्री बद्दल सांगीतले तर पेालीस म्हणतात एवढेच काम आहे का, हातावरचे काम संपल्यावर येवू, गडबड कशाला असे उत्तर मिळते, विशेष म्हणजे अनाधिकृत अवैद्यरित्या देशीदारु विक्री, जूगार, मटका कोठे व कसा खेळला जातो याची माहिती पोलीसाना असतेच देशीदारु विक्री तर पोलीसांच्या सहकार्यानेकेली जाते अशी चर्चा होत असून उत्पादन शुल्क अधिकारी, पोलीस अधिकारी अशा अवैद्य देशीदारु विक्रीकडे दुर्लक्ष कसे करतात हा प्रश्‍न सर्वत्र चर्चिला जातो आहे. 
देशीदारु दुकानाशेजारी वेळेपूर्वी वेळेनंतर आणी बंद काळात सर्रासपणे अवैद्य देशी दारु विक्री होते याकडे पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी लक्ष देतील काय आणी लातूरची कायदा व सुव्यवस्था कायम स्वरुपी शांत व न्यायीक राहील काय अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या