लातूर २१३ पैकी १८७ निगेटिव्ह ०८ पॉझिटिव्ह ०९ inconclusive व ०१ रद्द
लातूर (जिमाका) ः विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण २५ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २३ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०२ व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहायक प्राध्यापक डॉ. वर्षा कलशेट्टी यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून ६१ रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात २५ रुग्ण दाखल असून ०५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत ३६ रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.
आज ०४ रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी ०३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते एक रुग्ण १३ दिवस व्हेंटिलेटरवर होता. व दूसरा रुग्ण १० दिवस अतिदक्षता विभागात होता व उर्वरीत एक रुग्ण ०४ दिवस व्हेंटिलेटरवर होता व दूसरा रुग्ण ०६ दिवस व्हेंटिलेटरवर होता त्याचे डायलिसिस करण्यात आले होते या सर्व रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.
*लातूर * ....जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 170, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 225 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 408 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.
*टीप:* चार कर्नाटक राज्यात तर तीन रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात वर्ग केलेले आहेत. परंतु उपचार लातूर येथे सुरू आहेत. चार रुग्णांना कर्नाटक राज्याने व तीन रुग्णांना उस्मानाबाद जिल्ह्याने पोर्टल द्वारे स्वीकारले असून त्या रुग्णांची नोंद संबंधित राज्य व जिल्ह्यामध्ये झालेली असल्याने आपल्या जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या संख्येतून 7 रुग्ण कमी करण्यात आलेले आहेत.
आज रुग्णालयातून उपचाराने बरे झालेल्या 9 रुग्णांना सुट्टी देण्यात आली तर सामान्य रुग्णालय उदगीर येथील एका महिला रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.