दिनांक 04.07.2020
लातूर 236 पैकी 192 निगेटिव्ह 16 पॉझिटिव्ह 11 Inconclusive 25 प्रलंबित व 02 रद्द
लातूर (जिमाका) ः विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 73 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उर्वरीत 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 02 व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.
दिनांक 03.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.
मा. जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी विलासराव देशमुख वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असलेल्या विलगीकरण कक्षास व अतिदक्षता विभागास भेट देऊन पी. पी. ई. कीट घालून पाहणी केली व आवश्यक त्या उपाय योजना सुचविल्या. यावेळी डॉ. गिरीष ठाकूर अधिष्ठाता, डॉ. रामराव मुंढे हे उपस्थित होते.
Among positive: MC 12 positive ( 10 LIC colony, 1 Khandoba galli, 1 Balaji nagar), Udgir 4 positive ( 1 Netragaon, 1 Mominpura, 2 Degloor road)
लातूर* ...जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 173, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 242 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 428 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.
*टीप:* 3 कर्नाटक राज्यात तर 4 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात वर्ग केलेले आहेत. परंतु उपचार लातूर येथे सुरू आहेत. त्या रुग्णांची नोंद संबंधित राज्य व जिल्ह्यामध्ये झालेली असल्याने आपल्या जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या संख्येतून 7 रुग्ण कमी करण्यात आलेले आहेत.
आज13 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी पाच रुग्ण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील तर 3 रुग्ण हे एमआयडीसी मधील कोविड केअर सेंटर येथील असून उर्वरित पाच रुग्ण हे उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे येथील कोविड केअर सेंटर मधील आहेत, असे एकूण 13 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.