बारा बलूतेदार, दलितावरील अन्याय, अत्याचार, शेतकरी, लघू उद्योजकासाठी बसपाचे आंदोलन- ऍड. संदीप ताजणे
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः दीन-दलितावरील होणारे वाढते अन्याय, अत्याचार, कोरोनामूळे बाराबलूतेदार, बांधकाम मजूरांची ससेहोलपट, लघू उद्योजकाची गळचेपी, बहूजन-मागासवर्गीय विद्यार्थ्याची शैक्षणीक शूल्क माफ करणे, शिष्यवृत्ती वाढ करणे, विद्यार्थ्याच्या वस्तीगृहास प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेसीलीटी हॉस्पीटल निर्माण करणे अदी विविध मागण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर ७ जूलै २०२० रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार पर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन बहूजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणी राज्यपाल कोश्यारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
बहूजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यानी मुख्यमंत्री व राज्यपाल याना दिलेल्या निवेदनात इंधन दरवाढ त्वरीत कमी करावी, कोरोना बाधीतासाठी आरोग्य सुविधा विनाविलंब पुरवाव्यात, कोरोना प्रदूर्षणामूळे पूढील तीन महिने वीज बिल माफ करावे, विद्यार्थ्याचे शैक्षणीक साल २०१९-२०२० आणी ते २०२१ पर्यंतचे शूल्क माफ करुन महागाई निर्देशांकानुसार जी ओआय शिष्यवृती वितरीत करावी, लघू उद्योजकाना, बांधकाम मजूर, बाराबलूतेदार, असंघटीत कामगाराना विशेष अनुदान द्यावे, विद्यार्थ्यासाठी कायमस्वरुपी वस्तीगृह निर्माण करुन कोविडग्रस्तासह इतरासह सुपर स्पेशालीटी दवाखाने निर्माण करावीत, राज्यभरातील शेतकर्याना नवीन कार्जासह त्याना बांधावरच बी बियाने उपलब्ध करुन द्यावीत, गृह, वहाने, तारणकर्ज, सुक्षम उद्योग कर्ज, बचत गटाचे सहा महिण्याचे हप्ते माफ करावेत, रिक्षा, टॅक्सी, टेंम्पो, माल वहातूक वहनाचे कर्ज हप्ते माफ करुन रोकड अर्थ सहाय्य करावे, बोगस बी-बियाणे पूरवठा करणार्या कंपन्याचे परवाने रद्द करावेत, कोरोना, कोविड संकटामूळे गरजूना डीसेंबर पर्यंत मोफत धान्य द्यावे, दीन दलितावरील होणार्या अन्याय, अत्याचारावर पाबंदी आणून सदरील प्रकरणे विशेष जलदगती न्यायालया मार्फत चालवावीत त्यासाठी तज्ञ सरकारी वकील नियूक्त करुन अत्याचार ग्रस्ताना एक लाख रुपये तर मृतांना दहा लाख रुपये द्यावेत अशा मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही निवेदनात बसपा प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांनी मुख्यमंत्री व राज्यपालाना दिली आहे.