गौण खनिजे अवैद्य वाळू उपसा चिरीमिरीतूनच वाढतोय
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर लोकसभा राखीव मतदार संघातील लोहा तालूक्यातील कापसी (बु) येथील मंडळ अधिकारी एन.जी. लव्हू कानगुळे यास अवैद्य वाळू उपसा करुन नेण्यासाठी सवलत देतो, कारवाई होऊ देत नाही असे वाळू माफीयास सांगून त्यांच्याकडून एकवीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडल्याने वाळू तस्करी ही महसूल कर्मचारी, अधिकारी व पोलीसांच्या सहकार्यालतूनच होत असावी असे सर्वत्र बोलले जात आहे.
लोहा-कापसी नदी पात्रातील वाळू उपसा नेहमीच होत असते ही वाळू येथील व्यक्ती नेहमीच करीत असावी त्याचे तीन टीप्पर वाळू असलेले वहाने पकडून कारवाई करणार नाही किंवा पून्हा तसे होऊ देणार नाही यासाठी मंडळ अधिकारी कानगूळे यानी तीस हजाराची मागणी केली तडजोडीत २१ हजार रु ठरले त्यातील दहा हजार देवून पून्हा लाच स्विकारताना मंडळ अधिकारी कानगूले याना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरिक्षक कपील शेळके यांच्या तक्रारीवरुन गून्हा दाखल केला असून पूढील तपास चालू आहे असे पोलीस सुत्राकडून समजले.
विशेष म्हणजे मराठवाड्यात राजरोसपणे अवैद्य वाळू उपसा होत असतो तक्रारी येत असतात त्यानुसार चौकशी होते पून्हा वाळू उपसा होतच असतो पण बंद होत नव्हता याचे कारण म्हणजे स्थानीक कार्यकर्त्यासह महसूल विभागातील अधिकार्याची साथ असल्यानेच गौण खनिजे वाळू उपसा हा चिरिमिरीतूनच अर्थात महसूल विभागाच्या आर्शिवादानेच होतो आहे हे लोहा तालूक्यातील वाळू उपसा प्रकरणावरुन निष्पन्न होते यावर विभागीय आयूक्त काय निर्णय घेतील याकडे महसूल विभागातील कर्मचार्यासह शेतकरी व आमजनतेचे लक्ष वेधून राहीले आहे.