लातूरच्या विभागीय आयूक्तालयाचा तिढा कधी सूटणार

लातूरच्या विभागीय आयूक्तालयाचा तिढा कधी सूटणार
       लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूरला विभागीय आयूक्त कार्यालय दिवंगत कॉंग्रेसनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमूख यानी मंजूर करुन कार्यालयीन बांधकामही पूर्ण केले होते पण मुख्यमंत्रीपद जाताच विलासरावाच्या मानसबंधू अशोकराव चव्हाणानी ते नांदेडला पळवून नेले होते पण विभागीय कार्यालय वादातीत आहे आज घडीला लातूरचे पालकमंत्री अमित देशमूख तर राज्यमंत्री संजय बनसोडे आहेत भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आम. रमेश कराड, राकॉचे बाबासाहेब पाटील असून लातूर विभागात येणारे इतर जिल्ह्यातील आमदारही लातूरच्या बाजूने असल्याने लातूरच्या विभागीय आयूक्तालयाचा तिढा कधी सूटणार अशी चर्चा होताना दिसते आहे. 
        लातूर विभागीय कार्यालयात मोडणार्‍या, इतर जिल्ह्यातील कोणही आमदार विरोध करणार नाही.  अशोक चव्हाण हे बांधकाम मंत्री असले तरी राज्य मंत्री संजय बनसोडे असल्याने पालकमंत्री अमित देशमूख यानी पुढाकार घेतल्यास निश्‍चितपणे लातूरलाच विभागीय आयूक्तालय होणार त्यासाठी तत्कालीन आयूक्त मुंडे याचा अहवाल पूरेसा ठरावा अशी  चर्चा होत असून त्यासाठी पाठपूरावा करुन पंधरा ऑगष्ट स्वातंत्र्यदिनी लातूरच्या विभागीय आयूक्तालयात ध्वजरोहन व्हावे अशी जनतेची अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या