झरोका
एक - भाजपाचे केंद्रात बहूमत असल्याने व्यक्ती स्वांतत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. मुस्कटदाबी होते आहे. सरकार विरोधात बोलले-लिहीले की देशद्रोहाचा खटला भरला जातो आहे. नंदी बैलासारखे मान हलविली तर तो देशभक्त ठरविला जातोय सरकार कोणत्या मार्गाने चालले आहे हेच कळत नाही डोकं सून्न झालय.
दुसरा - वेड लागलय का तूला. अरे लोककल्याणासाठी नवनव्या योजना सरकार राबवित आहे. देशातल्या सर्वच राज्याना भरभरुन निधी दिला जातो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मसिहा आहेत, भारताला महासत्ताक बनवू पाहत आहेत त्याना दोष कसा काय देतोस.
एक - लोकल्याण कोठे दिसते आहे. उद्योजक, व्यापारी याना भरभरुन दिले आणी त्यानाच देशाबाहेर पाठविले की लोककल्याण म्हणावे काय, गोर,गरीब,कामगार,मजूर टाळेबंदीत उपासी मरतात पंरतू प्रधान मंत्री नरेंद्र मेादी मनकी बात मध्येच गुंतून आहेत हे कसले पंतप्रधान म्हणावे, हेच कळत नाही.
दुसरा - अरे सारा भारत कौतूक करीत आहे असे प्रधान मंत्री, मोदी हेच असावेत म्हणून प्रार्थना करीत आहेत. स्मार्ट इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, टॉप मोस्ट इंडिया फक्त नरेंद्र मोदीच करु शकतात. कोरोना-कोविड काळात जगभरातून निधी येतोय, तो कोठे ठेवावा-कोठे वापरावा असा प्रश्न पडलाय आणी तू कांहीतरीच बडबड करीत आहेस, गप्प बस्स.
एक - मला गप्प बस कशाला म्हणतोस, ते विजय मल्ल्या, निरव मोदी वगैरे सारे ठग बँका व सरकारला जूना लावून गेले, त्याचे काय केले कसला विकास साधणार आहेत. टाळेबंदीत पायखोरुन लोक मरताहेत त्याचे काय.
दुसरा - कांहीही झाले तरी तूम्ही कांहीही करु शकत नाही. तूम्हा विरोधकात एकवाक्यता, एकमत, एकनिष्ठता, नेतृत्वगूण नाहीत मग तूमच्या ओरडण्याने काय होणार आहे. आजघडीला भारताला नरेंद्र मोदी याचेशिवाय पर्यायच नाही समजलं का ?
एक - अरे अशा भ्रमात राहू नका, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, शिवसेनेने मनावर घेतले आणी सरकार विरोधात मोर्चे काढून जाब विचारणारे, आंदोलन छेडणारे, जेलभरो करणारे पूर्वीचे पँथर अर्थात रिपब्लिकन कार्यकर्ते, दलित मूक्ती सेना आणी बहूजन समाज पार्टी व विविध संघटनाचे नेते कार्यकर्ते एकत्रीत येवून भाजपा हटाव मोहीम सुरु केली तर देशद्रोही कोण आणी देशभक्त कोण हे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणी तूम्हालाही कळेल. केंद्रात बहूमत मिळाले म्हणून काय झाले, लोकशाहीत सत्तांत्तर होतच असते हीच लोकशाहीची ओळख असते. समजले का, बहूमत म्हणजे एकमत नाही, प्रादेशीक पक्षाच्या, संघटनेच्या कुबड्या घेवूनच केंद्रात व राज्या-राज्यात सरकारे कार्यरत आहेत ही लोकशाही आहे एवढेच लक्षात असावे म्हणजे झाले.