टाळेबंदीत जीव वैतागला, मूक्ती हवी !
लातूर (दै.लातूर प्रभात प्र) ः कोरोना-कोविड १९ या विषारी विषाणू रोगाचा फैलाव स्थिरावत असताना संशयीताचा आकडा समोर करुन पॉझिटीव्ह रुग्ण समोर ठेवणे आणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णाना बाजूला ठेवून मृताची घोषणा करुन जनते मध्ये भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत असून तशी चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
टाळेबंदीमूळे जनता वैतागलेली आहे. कामधंदा नसल्याने पोटाला पीळ देवून घरात पडून, बसून राहावे लागते त्यात आरोग्य विभागाकडून दिशाभूल व भितीदायक वृत्तप्रसिध्द होत असल्याने कोरोना-कोविड हा महामारी रोग आम्हाला तारेल किंवा मारील पंरतू टाळेबंदीतून मूक्त करावे अशी संतापजनक मागणी होत असून राज्यभरात टाळेबंदी शिथील झाली असताना लातूर ते सरकारचे काय घोडे मारले आहे अशीच लोक चर्चा करीत असून जिल्हाप्रशासनाने टाळेबंदी मूक्त करुन मोकळ्या वातावरणात जगू द्यावे अशी मागणी जनतेतून होताना दिसते आहे.
टाळेबंदीत जीव वैतागला असून कोरोना-कोविड निर्मूलनासाठी सरकारी नियमाचे काटेकोर पालन करु पण घरात डांबूनका मुक्त करावे अशी आर्त हाक जनतेतून येताना दिसते आहे.