लातूर :लोकसभेचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहमंत्री, कोंग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर येथील *देवघर* निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार *संसदरत्न* सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांची विचारपूस करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी चाकूरकर साहेबांनी खा.सुप्रियाताईंना आपले आत्मचरित्र भेट दिले.
याप्रसंगी डॉ अर्चना पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे व बबन गीते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजा मणियार, प्रयुकॉ चे कार्याध्यक्ष चंदन पाटील, प्रयुकॉ चे सरचिटणीस प्रा. प्रशांत घार, लातूर ग्रामीण विधान सभेचे अध्यक्ष मदनराव काळे, लातूर तलुका कार्याध्यक्ष बख्तावर बागवान, रायुकॉं जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी व समीर शेख, परमेश्वर पवार, बापू पाटील, रेखाताई कदम, मनिषाताई कोकणे, आदी उपस्थित होते. *चाकूरकर - पवार कुटुंबीयांचे जुने स्नेह संबंध असल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला.*