जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 2 जून रोजी आयोजन

          लातूर, दि. 30 (जिमाका) :  शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जून महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 2 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

        तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी किंवा अर्ज विहीत नमुन्यातदोन प्रतींमध्ये संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर केलेल्या अर्जावर 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यासनागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित केला जाईल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या