*महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज. भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत *

       लातूर, दि. १० (जिमाका): शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ साठी रि-अप्लाय आणि सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शासनमान्य, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क फ्रिशीप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेता येईल.
      ८ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क, विद्यापीठाद्वारे आकारले जाणारे इतर शुल्क आणि शैक्षणिक विभाग तसेच शासकीय यंत्रणांकडून घ्यावयाची मंजुरी याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि लिपिक कर्मचारी यांच्यावर आहे. महाविद्यालयांनी समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे.
      सर्व प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज अचूक भरून १५ जून २०२५ पूर्वी ऑनलाईन सादर करावेत. अर्ज प्रलंबित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आर्थिक जबाबदारीस पात्र राहतील, असे लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी स्पष्ट केले.
*****

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या