लातूर (पोआका) : लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक सुरेशकुमार राऊत हे पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आक्टोबर 2021 मध्ये शिरूर घोडनदी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र वर भर दिवसा पाच दरोडेखोरांनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 50 लाख चा मुद्देमाल लुटला होता.
पोलीस उपाधीक्षक राऊत हे शिरूर घोडनदी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने गुन्ह्याचा तपास करत पाचही आरोपी दहा दिवसात अटक करून 100% रिकव्हरी करत एकूण 2 कोटी 50 लाख रुपयाचा मुद्देमाल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केले होते.
सदर तपासाची दखल घेत केंद्रिय गृहमंत्री यांचे केंद्रीय स्तरावरील त्याबद्दल पदक सण 2022 मध्ये राऊत यांना जाहीर झाले होते. त्याचे वितरण दि. 13/06/2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचलक श्रीमती रश्मी शुक्ला यांचे हस्ते पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे पार पडले आहे.
सुरेशकुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक मिळाल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी पोलीस उपाधीक्षक राऊत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुहास वारके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे उपस्थित होते.