लातूर, दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका, घोषणा देणे, सभा घेणे इत्यादीवर निर्बंध घातले आहेत.