निवडणूकीत पैसा उधळणारे हात कोरोनाच्या संकटकाळी गेले कोठे
लातूर (दै.लातूर प्रभात,प्र.) ः लोकसभा विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसह भाजपा, सेनेच्या उमेदवारांनी वारेमाप पैसा उधळला अशी चर्चा होत होती. पंरतू आजघडीला भाजपाची सत्ता नसली तरी महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे सरकार सत्तेत असतानाही लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय उमेदवार, लोकप्रतिनिधी कोरोनाग्रस्त लातूरकरांच्या संकटकाळी कोठे आहेत. अशी उलटसूलट चर्चा राजकीयक्षेत्रासह मतदारात होताना दिसते आहे.
लोकसभा, विधानसभा निवडूकीत वेगवेगळे आश्वासने देत प्रत्येक उमेदवारानी निवडूकीच्याकाळात वारेमाप पैसा उधळला असल्याची चर्चा आज ही होताना दिसते आहे. पंरतू कोणाचा विजय झाला असेल, कोणी पराभूत झाले असले तरी ते राजकीय कार्यकर्ते असल्यामूळे लातूर शहर व जिल्हाभरात कोरोना कोविड या विषारी रोगाने आमजनतेसह गोरगरीब कामगार मजूरांना लॉकडाउन मध्ये कोंडवून ठेवले असून उपासमारीत जिवन कंठीत राहावे लागते आहे. अशा संकटकाळी मदतीचा हात पुढे न करता निवडणूकीतील उमेदवार आणि आजचे राजकीय कार्यकर्ते असलेले लोकप्रतिनिधी अशा संकटकाळी कोठे आहेत, अशीच चर्चा होत असून उद्याला लॉकडाउन मध्ये अडकून पडलेले हातच या लोकप्रतिनिधीचा उद्याचा आधार आहेत, याचे विस्मरन लोकप्रतिनिधीना कसे काय झाले असावे अशी ही संतापजनक चर्चा जिल्हाभर होताना दिसते आहे.