कोरोना प्रश्नी केंद्रीय पथकाची भिती अनाठाय
मुंबई (दै.लातूर प्रभात,प्र.) ः कोरोना कोविड या विषारी संसर्गजन्य रोगाचा फैलाव, सद्यःस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रिय पथक मुंबई दौर्यावर आले होते. याच पथकाने मुंबई येथील धारावी झोपडपट्टीची पाहणी केली, अरुंद रस्ते, दाट वस्ती, आरोग्य सुविधाची कमतरता, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असे प्रकार निदर्शनास आले असल्यामूळे केंद्रिय पथकाने शासन, आरोग्य विभागासह मनपा प्रशासनाला सुचना केल्या, त्यावेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही सोबत होते.
कोविड प्रार्दूभावाचा प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र सरकारला अहवाल देण्या बाबत, मुंबई दौर्यावर आलेल्या केंद्रिय पथकाने मुंबईची परिस्थिती ही आटोक्याबाहेरची असून संपूर्ण मे महिना कोविडग्रस्तच राहतो की काय अशी शंकात्मक भिती व्यक्त केली होती, त्यानुसार शासन ही सतर्क होवून केंद्रीय पथकाच्या सुचनेनुसार कामास लागल्याचे चित्र दिसते आहे. पंरतू अशातच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केंद्रिय पथक मुंबईत आले होते, त्यांनी पाहणी करुन कांही सुचना केल्या आणि मुंबईत कोविडचा फैलाव आणि तोही मे महिना पुर्णपणे राहिल असे म्हटलेच नाही, असा खुलासा केल्याने मुंबईकरांचा जिव भांड्यात पडला अशीच चर्चा होताना दिसते आहे.