स्थलांतरीत कामगाराना त्यांच्या मुळ गांवी पाठवा

स्थलांतरीत कामगाराना त्यांच्या मुळ गांवी पाठवा



लखनऊ (दै.लातूर प्रभात,प्र.) ः कोरोना कोविड या संसर्गजन्य रोगाने सारा भारत पोखरुन टाकला आहे.  युध्द पातळीवर कोविड १९ चा पाडाव करणेसाठी प्रयत्न होत असले तरी लस व औषधी सामुग्री नसल्याने निर्मूलनात अडथळे येत असून केंद्र सरकारने वेळीच उपचार करावेत असे अहवान करुन राजस्थान मधील कोटा येथून त्या त्या राज्यातील सरकारने विशेष बस द्वारे तेथील विद्यार्थ्याना आपापल्या राज्यात आनले आहे.  तशाच पध्दतीने स्थलांतरीत कामगार मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील मुळ गांवी पाठविण्यासाठी केंद्र सरकारने सोय करावी अशी मागणी समाज माध्यमातील संदेशाद्वारे बहुजन समाज पार्टीच्या प्रमूख बहन मायावती यांनी केले आहे. 
 राष्ट्रीय टाळेबंदीमूळे महाराष्ट्र दिल्ली, हरियाना वगैरे राज्यात लाखो कामगार मजूर कामाविना अडकून पडले असल्याने त्यांची उपासमार होत आहे.  त्यांना घर गाठायचे आहे.  पंरतू लॉकडाउनच्या अडथळ्यामूळे ते गंभीर स्थितीत जिवन कंठीत आहेत.  त्यासाठी केंद्र सरकारने सहानुभूतीने विचार करुन स्थलांतरीत कामगार मजूरांना त्यांच्या त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याची सोय करावी.  त्याच बरोबर त्या त्या राज्यानी त्या त्या मजूरांना घेवून जाण्याची व्यवस्था करावी, अशी अहवानात्मक मागणी ही बसपा नेत्या बहन मायावती यांनी केली आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या