सामाजीक अंतर आहे ना...

संपादकीय...


सामाजीक अंतर आहे ना...


कोरोना कोविडचे विषाणू महाकाय महामारीचे आहे.  ते दिसत नाहीत पण माणवी शरीरात घुसखोरी केल्याशिवाय राहत नाही.  मृत्यूचा सांगावा घेवून आलेल्या या कोविडला विनाशकाली विपरीत बुध्दी वापरुन हद्दपार करता येणार नाही, तर त्या विषारी विषाणूला ओगांरुन गोजांरून त्याची उत्पती त्यावरील उपायाची अधिकृत माहिती घेवूनच त्या कोविड निर्मूलन केले पाहिजे.  हे तमाम जनतेच्या लक्षात येणे घेणे गरजेचे आहे.  डोक दुखू लागल, ताप आल्याचे वाटले की, सॉरिडॉन,अनासीन,घेणे किंवा गल्लीत घाण साचली म्हणून मनपाच्या विरोधात एका कागदावर ते वृत्तपत्र कार्यालयात दिले की झाले.  अशातला हा कोविड विषाणू निर्मूलनाचा विषय नाही, त्यासाठी संशोधन करावे लागते.  करोडे रुपये खर्च करावे लागतात.  अनेक वैद्यकीय तज्ञाला एकत्रित बसून चर्चा करावी लागते. त्यास वेळ लागतोच पण वेळीच ते होवू शकत नाही. कारण सामाजीक अंतराचे भान ठेवले पाहिजे.  त्याचे कोटेकोर पालन न झाल्यास आदेश भंगाची कारवाई म्हणून साम, दाम, दंड वगैरे सार कांही आलेच म्हणून समजा, त्यासाठी गरज कितीही महत्वाची असो सामाजीक अंतर ठेवूनच करावे हेच आपले आद्य कर्तव्य आहे.  हे लक्षात ठेवा म्हणजे झालेच. 
 कोणाचे आई किंवा वडिलाचा मृत्यू झाला तरी त्यास लॉकडाउनमुळे अत्यविधीला जाता येत नाही.  परवा एका मंत्र्याच्या वडीलाचे निधन झाले होते.  पंरतू कोरोनाच्या लॉकडाउनमुळे ते जावू शकले नाही.  मग बाजारात गेलो पण धान्य मिळाले नाही, भाजीपाला मिळाला नाही, अशी ओरड करणे प्रशासनाच्या नियमाला धरुन नाही.  त्यानी वेळ ठरवून दिलेली आहे.  त्याच वेळी काय ते द्यावे, घ्यावे, अन्यथा लॉकडाउनचा भंग म्हणून कारवाई आहे.  पंरतू त्यास सामाजी अंतराचे बंधन नसावे, कारण कारवाई करायची, दंड वसूल करायचा म्हणजे झाडा झडती घ्यावी लागते, त्याशिवाय जवळ काय काय आहे, काय नाही, हे समजने कठीनच असते.  पण इतर कोणी काय घडते ते पाहण्यात येत असतील तर त्यांना मात्र लॉकडाउन, सामाजी अंतराची काठी आहे, हे विसरता कामा नये.  अशी चर्चा होत असली तरी ती निरर्थक असावी हे सिध्द होईल यात शंका नसावी. 
 कोरोना संशयगृस्त म्हणून चवदा चवदा दिवस अडकून पडावे लागते तर निधान लागले आणि कोविड बाधीत अहवाल आला तर मग कांहीच खरे नाही, सारं कांही ठिक होईल पर्यंत सरकारी दावणीत पडून रहावे लागते.  तेही सामाजी अंतर ठेवूनच, पण हे सामाजीक अंतर म्हणजे काय व ते कशासाठी ठेवायचे हेच कळत नाही म्हणून एका अधिकार्‍याला एकाने विचारले असता, त्यांने उत्तर दिले ते कशात वाचले की, कोणी सांगीतले त्याच विचार म्हणून सांगीतले.  त्यावेळी तो व्यक्ती बुचकाळ्यात पडतो.  तो पेपर वाचत असताना त्या पेपराचे नांव माहित नव्हते.  तेवढ्यात एकजन म्हणाला बग ते पुढून येत आहेत, तेही संपादक आहेत, त्यांना विचार म्हटल्याने तो गृहस्थ पुढे गेला आणि विचारण्यापूर्वीच त्या संपादकाने थोबाडाला मास्क, रुमाल नाही, आणि सरळ अंगावर येतोस, सामाजीक अंतर माहित नाही काय म्हणून बोलतो, त्यामूळे त्या व्यक्तीची गाळण झाली.  मग ताप आली, विचाराने डोके दुखू लागले, जिव गुदमरु लागला असे का होतोय म्हणून फुकटच्या सरकारी दवाखान्यात गेला आणि त्यालाच कोरोनाग्रस्त म्हणून दवाखान्याच्या नरकात ढकलून दिले.  त्यावेळी त्याव्यक्तीला सामाजीक अंतर म्हणजे काय ते कळले.  म्हणूनच सामाजीक अंतराचा भंग करु नये असे सरकार, जिल्हा प्रशासन सांगते हेच सत्य वाटते.  असे समजून चालावे. 
 अनेकजन अन्न धान्य पुरवठा होत नाही, लॉकडाउनमुळे हात पाय बांधले गेले, जगाव की मराव अशी अवस्था झाली, आम्ही एकीकडे माय बाप दुसरीकडं, बायको, लेकरे तिसरेकडे अशा परिस्थित आम्ही कोंडवड्यात कुत्र्याचे जिवन जगत आहोत, इथं ही होरपळत, जवळच्याला सल्ला विचारावातर सामाजी अंतराची भिती, म्हणून एकजन दबक्या आवाजात म्हणाला धान्य धान्य कशाला म्हणतोस, सरकारकडं लॉकडाउनवरच, कोरोनावरच औषधं नाही, हिवतापाची लस,गोळ्या देवून उपचार करीत आहेत. गुमानं बस नाही तर गांवाकडे जा म्हणाला.  पण बचबच करु नये, नाहीतर तुझ्या बरोबर आम्ही ही रगडू, अशी भिती दाखवून सामाजीक अंतराचे महत्व पटवून दिले.  म्हणून डॉक्टर, प्रशासन, पोलीस यंत्रणेला प्रश्‍न करु नको, ते जे सांगतील ते करावे म्हणजे झाले.  गांव जळाले हनुमान बाहेर, अशीच गत तुमची आमच्या पेक्षा इतरांची आहे.  यात संदेह नसावा अशीच चर्चा होताना दिसते आहे. 
 खरतर जनता कर्फ्यू संचार बंदी, लॉकडाउन, सामाजीक अंतर हे सर्वकांही यातून कसे बाहेर पडावे, समस्यापासून कसे दुरावत जावे, यासाठीच हा खटाटोप असतो.  कारण राजकीय क्षेत्र प्रशासकीय तडजोड याशिवाय सत्ताकारण चालतच नाही, जनतेच्या समस्या सोडविणे, विकास साधने म्हणजे उद्या लोकप्रतिनिधी न होने, हेच गणितीय सुत्र ठरते. म्हणूनच कांही न करता जनतेला झुलवित ठेवणे, व त्याच आधारावर पुन्हा निवडून येने, क्रमप्राप्त असते म्हणूनच सामाजीक अंतर याचा अर्थ असा की समाजाच्या गरजेपासून दूर जा, दुर रहा, असाच अर्थ राजकीय मंडळीने घेतलेला असतो.  तो शासक, प्रशासकीय यंत्रणेच्या कुंडलीतूनच म्हणून तक्रारी करुन नका अपेक्षा बाळगू नका, गुमान जा किवा मरण स्विकारा तो सोईस्कर असेल, ठरेल कारण सामाजी अंतर आहे नां...


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या