मंदिराच्या वृद्ध पुजारी दाम्पत्यास तात्काळ मदत

मंदिराच्या वृद्ध पुजारी दाम्पत्यास तात्काळ मदत



लातूर ः  औसा तालुक्यातील बेलकुंड नजीकच्या संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना परिसरातील मंदिराच्या पुजारी कुटूंबियाची कोविड १९ च्या पाश्वभुमिवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याची माहिती मिळताच लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळास सुचना करून तातडीने मदत पोहोच केली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना आवारातील मंदिरात निवृत्ती आनंद्गावकर महाराज गेली कित्येक दिवसापासून सेवा देत आहेत. सदया कारखाना बंद आहे आणि लॉकडाऊनमुळे भाविकांची येजाही बंद आहे. त्यामुळे पुजारी असलेल्या या  वृध्द दामप्त्त्यावर उत्पन्नाचे कुठलेच साधन राहिले नाही. या परिस्थितीत भिक्षा मागण्या शिवाय त्यांच्या समोर कुठलाच पर्याय राहिला नाही. अशा आशयाचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिध्दीस दिले होते या वृत्ताची दखल घेऊन लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी तात्काळ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे यांच्याशी संपर्क सांधून पुजारी असलेल्या दाम्पत्याकडे मदत देण्याची सुचना केली.
औसा तालूक्यात वृध्द दामप्त्यावर भिक्षा मागण्याची वेळे, हे दुर्देवी बाब असून, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे दूर्लक्ष कसे अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 
 कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे यांनी मांजरा परिवाराच्या वतीने जीवनावश्यक वस्तू आनंदगावकर दाम्पत्या पर्यंत पोहोच केल्या अडचणीच्या काळात मदत पोहोच झाल्या बददल आनंदगावकर दाम्पत्यांनी मांजरा परिवाराचे आभार मानले आहेत.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या