कोरोना, साथी रोग, बारा बलुतेदाराच्या समस्या, सरकार पुढे एक आव्हाणच
मुंबई (दै.लातूर प्रभात,प्र.) ः विषारी कोविड विषाणू रोगाचे निर्मूलन करणेसाठीचा महाराष्ट्र शासनाचा आटापिटा असतानाच साथीचे रोग, सारी, चिकनगुणीया, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, अशा रोगाची अचानक साथ सुरु झाल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली असली तरी आरोग्य विभाग, तत्पर सेवेसाठी सज्ज असून कोरोना कोविडचे निर्मूलन करणेसाठी युध्द पातळीवर वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असून साथी रोगाचा मुकाबला करुन रोग निर्मूलन करणेसाठी स्वतंत्र योजना राबविली जात असल्याने आम जनतेने विचलीत होवू नये, असे अहवान आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सतिष पवार यांनी केले आहे. तर कोरोना रोगाचा निपटारा आणि साथी रोगाचे समुळउच्चाटन करणे बाबत महाराष्ट्र शासन योग्य ती खबरदारी घेवून जबाबदारीने ती कार्यान्वीत करीत असल्याचे अधिकृत सुत्राचे म्हणने आहे.
जिवनघेणा कोविड १९ पाडाव करणे, साथी रोगाचे उच्चाटन करणे, ही गंभीर बाब समोर असतानाच कोविड १९ चा संसर्ग होवू नये यासाठीच लॉकडाउन जारी केल्याने सर्वसामान्य जनतेसह बारा बलुतेदाराचे धंदे बंद पडले. त्यामूळे त्यांची उपासमार होत असल्याने न्हावी, सुतार, चर्मकार, कुंभार, सिखलकरी, गंवडी, अशा अनेक बारा बलुतेदाराचे प्रश्न ऐरणीवर आल्याने एकाच वेळी कोविड १९, साथीचे रोग, बारा बलुतेदाराचे प्रश्न अशा अनेकविध समस्याचे अहवान राज्य सरकारपुढे असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कसे काय अशा गंभीर समस्याचे निराकरण करतील याकडे राजकीय धुरिनाचे लक्ष लागून राहिल्याचे दिसते आहे.