लॉकडाउन नियमाचा भंग
लातूर (दै.लातूर प्रभात,प्र.) ः कोरोनाबाधीत रुग्णाचा किंवा कोविड विषाणूचा प्रार्दूभाव होवू नये यासाठी सरकारने लॉकडाउन जारी केले, ते सर्वासाठी बंधनकारक असून त्याचे काटेकोरपणे पालन करणे आमजनतेचे कर्तव्य ठरते. तरी ही अनेक व्यक्तीकडून लॉकडाउनचे पालन होत नसल्याचे दिसून येते. त्यामूळे स्थानीक प्रशासन अशा लॉकडाउन नियमाचा भंग करणार्या व्यक्तिवर खटला भरुन दंडात्मक कारवाई करीत असते. तरी ही तसे घडते, या बाबतीत सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. लातूर येथील एका मंदिरात एक भावीक व्यक्ती उघड्या अर्धवट अंगाने तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता देवपुजा करीत असताना दिसला. त्याचे वय किमान ७० ते ७५ वर्षाचे असावे, तो देव दर्शन आणि देवपुजेसाठी घरा बाहेर पडताना घरातील कौंटुबीक सदस्यानी त्याचे समुपदेशन केले नाही काय, लॉकडाउनचे पालन करणे त्यातील नियमाप्रमाणे तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधने बद्दल सांगीतले नाही काय अशा प्रकारे ती व्यक्ती अर्धवट वस्त्रात लॉकडाउनचे भंग करुन देवपुजा करते, त्यास कोणी अटकाव करीत नसेल तर लॉकडाउनचा नियम भंग करुन अशी कृती करणार्या भावीक व्यक्तीवर सरकार स्थानीक प्रशासन काय कारवाई करणार आहे, अशी गंभीर पणे चर्चा होताना दिसते आहे.
एकीकडे कामा निमित्ताने तोंडावर मास्क रुमाल बांधून रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अडवून लॉकडाउनचे पालन करीत नसल्याचा आरोप करुन त्याचेवर खटला दाखल केला जातो. त्याला कोरोनाग्रस्त कोंडवाड्यात डांबले जाते, पण देवाला आपलेसे करण्यासाठी आणि देवाचे आर्शिवाद घेवून वाटेल ते करण्यासाठी मुभा घेण्यासाठी एकवृध्द माणूस अर्धनग्न अवस्थेत मंदिरात जातो, देवदर्शन घेवून देवाजी पुजा करतो, त्याला मोकळीक आणि नियमाचे पालन करणार्याना बंधनात्मक कारवाई ही कसी काय असू शकते अशी चर्चा होत असली तरी मोकाट भावीकावर बंधन घालून देवासह लॉकडाउनला ही न्यायीक कक्षेतच ठेवावे अशी ही मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसते आहे.