सामाजीक अंतरातूनच लोकप्रतिनिधीनी मतदार संघाचा आढावा घ्यावा
लातूर (दै.लातूर प्रभात,प्र.) ः कोरोना कोविड हा संसर्गजन्य रोग आहे. अशा या महामारीच्या रोगापासून प्रत्येकांनाच दुर व संरक्षीत राहावे वाटते. परंतू जशी जनता लॉकडाउन मध्ये आहे, गरजू वस्तूसाठी मास्क रुमालाचा वाटप करुन बाहेर पडते, ते ही सामाजीक अंतराचे भानठेवूनच सर्वकांही होत असते. त्याच प्रमाणे लोकप्रतिनिधीनी ही सामाजीक अंतराचे पालन करुन किमान गाडीतूनतरी आपापल्या मतदार संघाचा आढावा घेवून ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्याकडून कागदी अहवालानुसार स्वतःच्या नावाने मतदार संघातील पाहणी दौरा जनतेसमोर ठेवावा अशी मागणी मतदारातून होताना दिसते आहे.
कोरोना रोगाची सर्वानाच भिती आहे. सर्वसामान्य जनता गोरगरीब कामगार मजूर ही पोटाला चिमटी मारुण लॉकडाउनचे पालन करीत आहेत. सामाजीक अंतर ठेवून गरजू वस्तूसाठी उसनवारीसाठी बाहेर पडत आहेत. याच पध्दतीने आजचा व उद्याही लोकप्रतिनिधी होणारच या भावनेतून लातूर जिल्हाभरातील प्रतिनिधीने आपापल्या मतदार संघातील कोरोना संकटकाळात जनतेची काय अवस्था आहे, कामगार मजूर कसे जगत आहेत, गरजू सोयी आणि लागणार्या गरजापोटी त्यांची व्यवस्था कशी काय आहे, ही बाब प्रत्यक्ष दौरा करुन अनुभवावी आणि मतदार संघातील लोकांच्या जगण्यातली अर्तता आणि त्यातील त्यांची होणारी धावपळ, या परिस्थितीचा आढावा घेवून शक्य ते काय करता येईल यासाठी वैयक्तीक व शासकीय पातळीवरुन सुविधा निर्माण कराव्यात आणि मगच वृत्तमान पत्रातून सल्ला किंवा मार्गदर्शन करावे अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. त्यामूळे नेहमीप्रमाणे नसले तरी आजघडीला कोरोनाच्या भयावह संकटकाळात सामाजीक अंतरातूनच लोकप्रतिनिधीनी मतदार संघाचा प्रत्यक्ष आढावा घेवूनच जनतेला सहकार्य करावे अशी मागणी होताना दिसते आहे.