कोरोनापेक्षा माणवी भावनाच प्रबळ

कोरोनापेक्षा माणवी भावनाच प्रबळ


ठाणे (दै.लातूर प्रभात,प्र.) ः संसर्गजन्य कोरोना विषारी रोगाने जगासह भारतीय नागरीकांचे भाव विश्‍व चिंतेने व्यापले असून अशा या रोगावर मात करणेसाठी वैद्यकीय यंत्रणा व शासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असल्यातरी अशा या साथसोवळे आणि औषधासह नागरीकांनी मनोबल राखले तर निश्‍चित संसर्गजन्य कोविड हा रोग विनाविलंब हद्दपार होईल यात शंका नसावी असे स्पष्टीकरण मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी केले आहे.  
 आजघडीला कोरोना या विषारी रोगाने सर्वसामान्य जनतेचे जगणेच कठीण करुन सोडलेले आहे.  त्यात लॉकडाउन मुळे जगणार्‍याचा जिवच गोठतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी कोरोनाबाधीत रुग्णावर स्वतःच्या जिवापलीकडे जावून डॉक्टर उपचार करीत आहेत. त्याना शासनाचे सहकार्य मिळत आहे.  त्यामूळे अशा परिस्थितीत मानवी भावनाची मनशक्तीची कशी साथ मिळेल कशी मदत होईल हे पाहने गरजेचे असून यातच कोरोना विरोधातील शक्ती दडलेली असल्याने त्यासाठी मानवी भावना प्रबळ झाल्यास कोरोना रोगावरील उपचाराला सहकार्य मिळेल आणि औषधी लस या उपचारावरील सावधानालाही बळ मिळेल असे ही स्पष्टीकरण डॉक्टर नाडकर्णी यांनी केले आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या