संपादकीय...

कोरोनातली करुणा...


कोरोना कोविडने भारतीय जनतेला मी का तू करुन सोडले आहे.  प्रथम मी आणि तू अशीच बेरीज वजाबाकी करुन जगण्यातले गणित सोडविण्यात सारेजन गुंतले असल्याने मी तू आणि कोणीतरी एकत्र येवून गुणाकारांने संख्या वाढवू आणि जगण्यातली जिद्द साध्य करण्यासाठी समुह गठीत करण्याची गरजच वाटत नसल्याने घरात कोंडून राहून ही आपणच आपल्या कुटूंबीयातील सदस्यांनाही मनमोकळे करुन बोलत नाही, जुन्या आठवणीला उजाळा देत नाही, कारण बातचीत सुरु राहिली तर संसर्ग होईल आणि कोरोना कोविडचे विषाणू आपल्या छाताडात घुसून आपला प्राण जिव हिरावून घेतील आणि जगण्यातली मजाच संपूष्टात येईल या भिती पोटी प्रज्ञा शिल करुणा या तत्वाचीच ओळख न कळत पणे आपण विसरुन जातो आणि एका भयावह अशा मरणाची भिती अंगी बाळगून सैरभैर होवून जगन शोधत असताना आपणच आपणासह एकमेकाना पाहत असताना दिसत आहोत.  हे केवळ जिवनातला शोध घेण्यासाठीच असावे यास कोणाचेही हरकत नसावी अशी चर्चा होताना दिसते आहे. 
 आपण भारतीय आहोत.  ३३ कोटी देवीदेवताचा जसा अनुभव आहे.  तसाच सर्व जातीधर्माचाही इतिहास आपणास अवगत आहे.  ही सारी कुंडली माहित असताना ही आपण आजघडीला एकमेकापासून दुर का आहोत, तर कोरोना कोविडचा शिरकाव आपणात होवू नये म्हणूनच हे साधे सरळ गणीत आपल्या समोर आहे पण या दुरावण्यात अबोल दुर राहाण्यातच सर्वकांही संपूष्टात येत आहे.  याचा आपण विचार करीत नाही.  हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही.  कारण रोग कितीही महाभयंकर असला तरी आपण जगलेच पाहिजे, हे आपले ध्यय असल्याने इतरांची परवा नाही, आपले घर जळून खाक झाले आहे.  दुसर्‍याचे घर जळते आहे.  ते विझविण्यासाठी आपण जात नाही, आपण आपल्या घराची झालेली राखच साभांळीत बसतो.  येथेच करुणा संपते हे लक्षात येत नाही.  याला माणूसपण कसे म्हणावे हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.  हा आजवरचा अनुभव नाकारता येणार नाही असे वाटते.
 कोरोनाने विचलीत करुन सोडले आहे.  टाळेबंदीचे पालन त्यात सामाजीक अंतराचे भान ठेवूनच जिव मुठीत घेवून सरकारी आदेश पाळावे लागतात.  भुकेसाठी कोलाहल आणि खानारे जिव चिडचिडीत आहेत.  लेकरंाची ओरड आहे, घरची दासी आपल्याच दासाकडे पाहते आहे, दास दासी अबोलच सारे कांही व्यर्थच लॉकडाउने सर्वकांही हिरावून घेतले.  तसं जगणं समजून घेवून, पोटभर पाणी पिवून, क्षणभर विसावता येते.  पण तीच ती परिस्थिती त्यामूळे जगणे कठीण झाले.  पण मरण दुरवरुन डोकावते आहे.  म्हणून जगण्याची आस धरुन धडपड चालूच असते.  करुणामय करुनेतून कांहीच साध्य होत नाही, तेवढ्या कानी पडते तो सरकारी शब्द, आम्ही ही लढाई जिंकूच, सर्व सोयी सावलती उपचार युध्द पातळीवर चालू आहे.  तूम्ही फक्त लॉकडाउनचे पालन करा.  सामाजीक अंतराचे भान ठेवा, हे शब्द आहेत, सोफ्यावर बसून सरकारी चालविणार्‍या लोकप्रतिनिधीचे म्हणून हायसे वाटते.  पण हे सारं कांही त्या भुकेला कसे कळणार, याचे उत्तर त्या सोफ्यातल्या सत्ताचालकाला कसे देता येईल ते अशक्यच असणार.  हे गृहीत धरुनच चालणे बंधनकारक आहे.  हेच आपले जगणे म्हणावे लागेल.  अशी परिस्थिती येवून ठेपल्याने करुणा बाजूलाच राहते, ही बाब आज जनतेला खटकत असल्याचे चित्र दिसते आहे.  हे नाकारता येणार नाही.  
 कोरोना हा एक साथीचा रोग आहे.  अशा संकटाला माणव मुठमाती देईल ही पण या संकटावर मात करणारी फौज ही गोरगरीब जनता कामगार, मजूर वंचीत समाज, डॉक्टर नर्स, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणेतील कर्मचारी असंघटीत कामगार हेच आहेत.  तेच व्यवस्थापन करतात.  सोफ्यावर बसून रामायन महाभारत बघत बघत आदेश देणारे लढाई जिंकू म्हणारे लोकप्रतिनिधी नव्हेत म्हणूनच त्यांच्याकडे करुणा नाही, आहे ती कामगार, मजूर, गोरगरीब व डॉक्टर मध्ये आहे.  हे वास्तव कोणी ही नाकारु शकत नाही. 
 घर एक मंदीर समजून कोंडवाड्यातील घरच्या सदस्यांची असेल त्यानुसार सोय करणारी खाउ पिवू घालणारीच आजघडीला त्या मंदिरातच कौंटूबीक बंदिस्थ त्रासामुळे हैराण झाली आहे.  प्रत्येकाची मागणे आहे, रुसणे फुगणे आहे, हेकर तेकर म्हणून ओरड आहे.  करणारी मात्र एकच आणि तिचे दोन हात एवढेच सोबतीला कोणाला सांगावे, बोलावे म्हटले तरी संसर्गाची भिती त्यात सामाजीक अंतर यामुळे तिच खचून जाते पण लॉकडाउन सामाजीक अंतर आणि घरातल्या हंटरला समजून घेवून ती उद्याचे स्वप्न रंगवीते आहे.  तिच्याकडे प्रज्ञा शिल करुणा आहे.  म्हणूनच एकीकडे जिवघेणा कोरोना कोविडची धास्ती त्यात लॉकडाउन सामाजीक अंतराचा बडगा आणि घरच्यांची उणीदूणी बोलणी यातून कोरोनाच्या मगरमिटीतून करुणा जागृत होते आहे.  ती चिरंजीव आहे, असावी म्हणूनच कोरोना कोविड मधून सूटका मिळेल पण संकटाची दाहकता, जगण्यातला अर्थ आणि जगण्यातही रोग मूक्तच संकटातून म्हणूनच पुढचा ठेच, मागचा शहाना, ही कहावत आहे ती सार्थच असावी कारण आजचे चिलबीले उद्याचे नागरीक, लोकप्रतिनिधी असतील.  त्याना हीच अनुभव ज्ञानाची लढाईसाठीची सिदोरी ठरावी अशीच करुणेतील लोकांची लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या