संपादकीय...
लोकसहभागाला
विरोधाभास कशासाठी
विविधतेतून एकतेत जखडलेला धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी भारत आजघडीला कोरोना कोविड १९ या विषारी संसर्गजन्य रोगानी ग्रासलेला आहे. सर्वतोपरी पराकाष्टा वैद्यकीय उपचारानी लोकसहभागातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे अशा या महाकाय प्राणपिपासू कोविडचा नायनाट करणेसाठी अटोकाट पर्यत्न करताना दिसत आहेत. जानेवारीच्या प्रारंभी व प्रत्यक्षपणे नकळत मुंबई मार्गे भारतात प्रवेश केलेल्या या कोरोना कोविडने आमजनतेसह केंद्र व राज्य सरकार आरोग्य विभागाची झोप उपडवून दिली. आणि सारं कांही झापटल्यागत कोविड १९ ने भारतावर कब्जा केला. हे वेळोवेळी सांगण्याची गरज नाही. पंरतू परिस्थिती अशी बनली आहे की, कोरोना कोविडचे नांव घेतल्याशिवाय क्षणभरही उसंत मिळत नाही. अशीच अवस्था बनल्याचे दिसते आहे.
जगभरात कोरोना कोविडचा प्रार्दुभाव वाढत असतानाच भारतातील कोविडची लागन जेमतेमच होती. विषारी कोविडचा पाडाव करण्यासाठी देशभरातील आमजनताच पुढे आली. आणि स्वतःहोवून जनता कर्फ्यू लादून घेतला. संचार बंदी लागू केली गेली. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरीकांचे कौतूक करीत करीत लॉकडाउन टाळेबंदी केली गेली. आणि ज्या जनतेने कोरोना कोविडच्या प्रदिबंधासाठी सहभाग नोंदविला त्यांनाच मोदी सरकारने घरा घरात कोंडून टाकले आणि जगणेच मुस्किल करुन सोडले. आजतागायत तीच परिस्थिती आहे. आणि ती तशीच आहे. यात कांहीच वावगे नसावे असा सरकारी अहवाल सांगतो. यात नवल नसावे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर कोरोना कोविड महामारी रोगावर कसोशीने युध्दपातळीवर उपचार करीत आहेत. बरेच रुग्ण बरे होवून घरी जात आहेत. ज्या रुग्णाना कोविडसह पुर्वीच लागण झालेले रोग यामुळे कांहीना मृत्यूला सामोरे जावे लागते आहे. पंरतू रोगाच्या अतिसारामुळे मरण येणे वेगळे आणि जिवंत राहूनही मेल्यागत जगणे यामूळे कोरोनाच्या धास्तीमुळे विलगीकरण अलगीकरणाच्या नावाखाली सरकारी बंदी खाण्यात डांबलेली जनता व्याकूळ भावनेतून मुकमत प्रदर्शन करीत असावी असेच चित्र दिसते आहे.
आजची फुगत चालेली आकडेवारी ही संशयग्रस्त कोरोना कोविड १९ या रोग्यांची आहे. नमुने तपासणीत जो बाधीत निष्पन्न होईल तोच खरा रोगी बाकीसारे निरोगीच हे सत्य असताना ही केवळ बागुलबूवा करुन जनतेला भेडसावून टाळेबंदीत जखडून ठेवण्याचे कुटकारस्थान केंद्र व राज्य सरकारचे दिसते आहे. अशी चर्चा कोंडवाड्यातील लोकामध्ये होताना दिसते. कारण कोरोना कोविडवर अद्याप औषधी लस उपलब्ध नाही, संशोधन चालू आहे, तात्पुरती औषधी लस एक दोन महिण्यात मिळेल, तर निर्णायक औषधी लस एक दोन वर्षात भारतातच निर्माण होईल असे सरकारच स्पष्ट करीत असल्यामूळे टाळेंबदी बंदीखाण्यात अडकलेल्या लोकात न्यायवाट शोधण्याची धडपड होताना दिसते आहे. हे सत्य नाकारता येत नाही.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की जनतेच्या सहभागाने त्यांच्यातील मनोधर्याने व आरोग्य विभागामूळेच कोरोना विरोधी लढाईत यश मिळवू, त्यात जनतेचे यश आहे. स्पष्ट करतात पण इतरत्र अडकलेल्या आमजनतेला कामगार मजूरांना त्यांच्या त्यांच्या गांवी जाण्यासाठी परवानगी देत नाहीत, कोणी खाजगी वाहनाने किंवा पायपीट करुन गांव जवळ करीत असेल तर त्यास आडवून सरकारी कोंडिवाड्यात डांबले जाते. त्यांना कोरोना कोविडचे लक्षणे नसतील तर त्यांना त्याच्या गांवी जावू देण्यात अडचण कसली हाच प्रश्न सर्वसामान्याना भेडसावत आहे.
एकीकडे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पहिले तर कोरोना संकटाची त्यांच्या वाणीनजरेतून वेदना व चिंता दिसते. असे मत त्यांची तळी उचलणारे व्यक्त करतात. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून एकतंत्री एकाधीकारशाही वापरुन स्वतःचे नेतृत्व सिध्द करु पाहत आहेत. अशी राजकीय वर्तूळात चर्चा होताना दिसते आहे. यातच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. सबका साथ सब का विकास, सबका विश्वास, हे तिनसुत्री धोरण स्विकारुन जनसेवा करतात. तर कोरोना कोविडचा फैलाव होवू नये म्हणून जनतेला लॉकडाउन सरकारी कोंडवाड्यात डांबून कोविडचे निर्मूलन होणार नाही तर आरोग्य सुवधा बरोबर त्या रुग्णाची माणसीकता ही संशयमी शांत जिद्दीची व शिस्तबध असावी असे त्यासाठी तडपण किंवा हुकूम हा उपचार ठरु शकत नाही. यासाठी लोकसहभागाला विरोधाभास हा पर्याय घातकी ठरु शकतो, अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
कोरोना कोविडच्या लढाईत जनतेचा सहभाग म्हत्वाचा आहे. वैद्यकीय क्षेत्राचे योगदान आणि प्रशासन व पोलीस यंत्रणाही तितकीच महत्वाची आहे. तर माणसानाच कशाला कोंडवून ठेवता. प्रत्येकांना जगावे वाटते. मरण कोणालाही नकोसे वाटते यात पृथ्वीवरील सर्वजन आलेच त्यासाठी लोकसहभागाला लॉकडाउन सामाजीक अंतर वगैरे गरजेचे असले तरीही हे सारं कांही लोकासाठी कोविड निर्मूलनासाठीच आहे. तर मग रोगाने मृत्यू त्यात टाळेबंदी, सामाजीक अंतर, सरकारी कोंडवाडा त्यात होमक्वॉरंटाईन या धास्तीमुळे लोक मरु लागले तर सर्वकांही कोणासाठी हा प्रश्न मागे शिल्लक राहतो. यासाठी अधिक ताणल्यास तुटण्याचाच संभव असतो. त्यामूळे लोकांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता, गरजे पेक्षा लोकांना जास्तीचे बंदीस्त न ठेवता त्यांना त्यांच्या त्यांच्या गांवी घरात राहू द्या, हीच लोकभावना दिसते.