उदगीर परिसरात अवैद्य दारु आणि जुगाराचा थयथयाट
उदगीर (दै.लातूर प्रभात प्र.) ः भारतासह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यात आणि उदगीर येथेही कोविड निर्मूलनासाठी लॉकडाउन चालू असताना त्याचे पालन न करता, उदगीर जवळील तोंडार या गांवी राजरोस पणे जुगार अड्डा चालू असल्याची खबर उदगीर पोलीसाना मिळाली आणि उदगीर शहर व परिसरात लॉकडाउनचे पालन होणेसाठी दक्ष राहता, राहता कांहीच्या पोलीस पथकाने तोंडार येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पंरतू जुगार अड्ड्यावर जुगार खेळणार्या लोकांना व चालकाला पोलीसानी ताब्यात घेतले. पंरतू काय कारवाई केली, हे कळण्या आधिच साटेलोट करुन जे कांही घडले ते घडले असेच नाही, हे दाखविण्यासाठी पोलीस म्हणतात, आरोपी पळून गेले. तर गावकरी म्हणतात जुगार खेळणार्याना पोलीसानी पकडले, या बतावणीमुळे कांहीतरी गौडबंगाल असावे अशीच चर्चा होत असली तरी तडजोडीत प्रकरणा मिटल्याची कुजबूज उदगीर पोलीस ठाणे परिसरात होताना दिसत होती. त्यामूळे जुगाराला अवैद्य दारु विक्रीला पोलीसाचे अभय असावे अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
दरम्यान उदगीर शहरात आणि परिसरा मध्ये कोरोना कोविडच्या संशयग्रस्त रुग्णाची वाढ होत असल्याने लॉकडाउनचे उलंघन होवू नये यासाठी उदगीर पोलीसाचा खडा पहारा आहे. पंरतू या गांभीर्य स्थितीचे उदगीर पोलीस अधिकार्याना कांही देणे घेणे नसावे म्हणूनच उदगीर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्यांच्या मित्रासह शेतीवर जावून पार्टी करीत होते, त्या पार्टीत रिचविलेली जास्त झाल्याने तेथून घेवून जाण्यासाठी सेवेत व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचार्यास बोलावीले पंरतू ड्यूटीमूळे जण्यास उशीर झाल्याने वैतागून मित्रासह पोलीस अधिकारीच पोलीस ठाण्यात आले. आणि घेवून येण्यासाठी का आला नाहीस म्हणून पोलीस कर्मचारी व मित्रासमक्ष पोलीस कर्मचार्यास चोप दिला. त्या सोबत मित्रानेही हाताचे पारणे फेडून घेतले. ही अवस्था पोलीस कर्मचारी उघड्या डोळ्यानी पाहत होते. प्रकरण चिघळते की काय, याची जाणीव झाल्याने इतर पोलीस अधिकार्यानी प्रकरणावर पडदा पाडला असला तरी प्रकरण पुढे गेले आणि वरिष्ठानी निलंगा येथील पोलीस अधिकार्याना चौकशीसाठी पाठविले. पंरतू सदरील प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न चालू असून ज्या पोलीस कर्मचार्यास मारहाण करण्यात आली त्याची बदली करण्यात आल्याचे समजते पण दारुडे साहेब मात्र तोर्यात असून लॉकडाउनची एैशीतैशी पोलीसच करीत असल्यामूळे चोर सोडून सन्याशाला फाशी अशीच कृती उदगीर पोलीस ठाण्याची अवस्था झाल्याची उलटसूलट चर्चा होताना दिसत असली तरी झाला प्रकार गुलदस्त्यातच राहतो की काय अशी शंका व्यक्त होताना दिसते आहे.