संपादकीय...
जगण्यातली गुन्हेगारी
भारतीय कुटूंब व्यवस्था जशी बळकट आहे, तशा समस्या ही त्याच तोडीच्या आहेत. कौंटूंबीक, सामाजीक, राजकीय, संकटाना तोंड देत माणूस हा जगण्यासाठी धडपडत असतो. यशापयेशाच्या झुंजीत तो स्वतःसह इतरांना जवळीक ठेवूनच संघर्षमय जिवन जगत असतो. त्यावेळी समाज व्यवस्थेतील नाते गोती जोडून ठेवूनच तो अविरतपणे जगताना दिसतो आहे. सुख, दुःख हे पेलवत, झुलवीत वेळ आणि काळाला ही हुलकावणी देवून जगतो आहे. त्यात त्याचा संशयम धर्यशिस्त आणि उद्याचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय आणि विश्वास त्याच्यात सामावलेला असतो. त्यासाठी तो निश्चित पणे निरागस भावनेतून येईल त्या संकटांना तोंड देवून पुढे जाताना दिसतो. कारण अशा संकटामुळेच आणि ते निवारण करण्याची जिद्द यामुळे कुंटूब व्यवस्था अधिकच बळकट होताना दिसते.
कालपर्यत हावळ, गड्डयाची बिमारी, पटकी, प्लेग, फ्ल्यू, या रोगाचा सामना करीत दुष्काळ आणि चीन, पाकिस्तानचे युध्द पाहिले, भुकंप पाहिला, अतिरेकी हल्ले, बॉम्ब स्फोट पाहिले, त्यावेळी मुंबई पुणेसह इतर ठिकाणी किंवा राज्या बाहेर खळगी भरण्यासाठी गेलेल्या कामगार, मजूरासह जे गेलेले होते, आणि जे गांवाकडे होते, आई, त्यांच्या मुलांना पत्र लिहून आनंदी रहा, आणि इतरांना आनंदी राहवेत म्हणून त्यांना जमेल त्या प्रमाणे सहकार्य कर, असे सांगते, आणि वेळ मिळेल त्यावेळी गांवी येवून भेटून जा असे पण पत्र पाठविते, पाठवित असेल, किंवा हस्ते परहस्ते सांगावा धाडीत असेल, तीत मायेची उब जिव्हाळा असतो. रक्ताच नात असत, हे सार जगता जगताच नितंळ निर्भयपणे समाजासमोर येतच असते. ते वात्सल्यामूळेच नक्कीच घडणारी नैसर्गीक प्रक्रिया असावी ती माणवी मुल्यांची निसर्गदत्त शास्त्रीय नियमावलीत असावी यात शंका कसली.
आईच्या पत्रातील वात्सल्य कळते. त्यातील गांभीर्य आणि आनंदी राहाण्या बरोबरच इतराना आनंदी ठेवण्यासाठी सहकार्याची भावना यातील माणवतेसाठीचा संदेश ही कळतो. पण आई वडीलांनी त्यांच्या वाट्याला आलेले संकट आणि आजच्या मुलांच्या वाट्याला आलेली माणव निर्मित सरकारी संकट कसे सांगावे असा प्रश्न पडतो. पंरतू आईच्या पदराखालची कुशीतली ओढ आणि लहान असताना भरवलेला घास आजही आठवत असला तरी सारी मुलं कमवती असली तरी आईचे वात्सल्य विसरत नसताना दिसतात. हे स्मरण आणि आजच्या वेदना कशा कळवाव्यात हाही प्रश्न प्रत्येक मुलाला पडलेला असावा. यात तिळमात्र दुजेपणा नसावा पण कुटूंब व्यवस्थेतील जगण्याची दाहकता, जिद्द, प्रेम आणि स्वार्थी आनंद लपवून ठेवता येत नाही. आणि उघडपणे आईला संागता येत नाही, अशीच अवस्था आजच्या सरकारी संकटाने त्या त्या मुलावर ओढवलेली जिवघेणे अवस्था कशी काय सांगावी असेच जगण्यातल्या गुन्हेगांराना पडली असावी असेच आजचे चित्र दिसते आहे.
जे कांणी संकटग्रस्त आहेत, बाधीत आहेत, त्यांच्यावर ओढवलेल्या भंयकर अशा संकटानी आम्हा मुलांना गांव जवळ करीत असतानाच्या प्रयत्नामुळे गुन्हेगार बनवून आम्हालाच सरकारी कोडंवाड्यात डाबून ठेवले आहे, कारण आम्हा मुलांना हाताला काम नाही, पैसा नाही, म्हणून संकटकाळी गावी जावे म्हणून रस्ता जवळ केला. आई, बाबा, बायको, लेकरांना बघावे, त्यांच्यासोबत दिवस काढावेत म्हणून गांवचा रस्ता धरला तर सरकारी नियमाचा भंग केला म्हणून गुन्हेगार बनवून संकट टळेपर्यत कोंडवाड्यात राहाण्याची शिक्षा केली. गांवाकडे जातोय हा आमचा गुन्हा असेल तर भ्रष्टाचार करणार्या सरकरी बाबुचे गरज नसताना दंडूका मारणार्या पोलीसांचे काय, संकटकाळी काळाबाजार करणार्याचे काय, ते गुन्हेगार नाहीत काय, आणि तेच गुन्हेगार असतील तर आम्ही कोण म्हणून कोणास कसे सांगावे विचारावे हा प्रश्न भेटसावताना दिसतो आहे.
संकटकाळी लेकरं कसे आहेत म्हणून आईचं र्हदय हेलकावते आहे हे ज्ञात आहे. पंरतू आम्ही आजघडीला कोंबडी बकरी, जनावरासारखे कोंडवड्यात आहोत, आम्हीच कोंडवून घेवून सरकारला मदत करतो. नाममात्र चहा, नास्ता, दोनवेळचे जेवन पुरविले जाते. मग घरची ओढ कशाला म्हणून सरकारी धाक माणगुडीवर बसतो, आणि कोंडवाड्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आम्ही सारे जगतो आहोत, कुत्रेही घासकुटका खावून जगतात. त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक म्हणून घरी जावू द्या, उद्याचा सुर्य पाहण्याच्या अपेक्षने गांव जवळ करुन आई सोबत चार दिवस काढावे म्हणून सारी मुलं गांवचा रस्ता धरतात, परंतू आम्हासार्या मुलांच्या नशीबी जगण्यातील गुन्हेगारीच वाट्याला येते. मग आईच्या पत्राला कोणत्या भाषेतून कोणत्या कारणाने उत्तर द्यावे हा प्रश्न पडतो. पंरतू खुन दरोडे घालणारे, अन्याय अत्याचार करणारे, भ्रष्टाचार करणारे सारे मोकाट आणि आम्ही सारी मुलं मात्र गांव जवळ करीत असताना गुन्हेगार बनवून आम्हाला लॉकडाउन ऐवजी सरकारी कोंडवाड्यात डांबले जाते. हेच लोकशाहीचे प्रतिक असावे की काय हाच प्रश्न गंभीर आणि वास्तव असला तरी प्रशासन, पोलीस यंत्रणाच लोकशाही समाज व्यवस्थेलाच ठोकरत असून गुन्हेगारांना आश्रय देवून संकटकाळी गांव घर जवळ करणार्या रोग मुक्ती रक्षणाच्या नावाखाली संकट कोठडीत डांबून काय साध्य होणार आहे, हेच कळत नाही. पंरतू आंधळ्यापुढे नाचून काय, बहिर्या पुढे गीत, गाणी गावून काय अशी अवस्था माणूस आणि शासकीय यंत्रणेतील फरक आजघडीला झाला आहे. जगण्यातली गुन्हेगारीच वास्तवातली आहे पण यांनाच कोठडी आणि सरकारी गुन्हेगांराना मोकळीक याचेच नाव लोकशाही प्रशासन म्हणावे की काय, अशीच उपरोधात्मक चर्चा होताना दिसते आहे.