मानवतेच्या दृष्टीतून झोपड्याचा पुर्नविकास व्हावा
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड १९ च्या विषारी संसर्गजन्य रोगांने देश हादरला आहे. मुंबई शहराला तर कोविडने विळखाच घातला आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने देशभरात लॉकडाउन केला गेला. यातच कसल्याच सुविधा नसलेले गोरगरीब, कामगार मजूर उपासपोटी राहून लॉकडाउनचे पालन करीत आहेत. ही बाब सामाजीक ऐक्य व देश अंखड ठेवण्यासाठी प्रेरणा देणारी असून कोरोना हटावा नंतर तरी मानवतेच्या दृष्टीकोणातून मुंबईसह इतरत्र असलेल्या झोडपट्टीचे पुर्नविकास योजना राबवून पक्की घरे द्यावीत असे स्पष्ट मत उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले.
गरीब मजूरांना अपुरी जागा, मोकळी हवा नही, रस्ते पायवाटेची, निवासस्थाने दाटीवाटीतच, त्यात ही अतिक्रमणे,यामुळे रोगराई वाढतेच आहे. यासाठी मानवीमुल्यांची जपवणूक आणि स्वाभिमानी भारतासाठी झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबवून गोरगरीबांना पक्की सुटसूटीत व्यवस्था असलेली घरे बांधून द्यावीत असे ही मत उद्योगपती रतन टाटा यांनी सरकारी व्यवस्थापना समोर एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.