घरात महिना दिडमहिना डांबून राहणे कठीणच
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः आजघडीला राजकारण, पक्षकारण महत्वाचे नाही, कोरोना कोविडचा विरुध्दच्या लढाईत आपणसारे एकत्रितपणे लढा देत आहोत पण लॉकडाउनच्या काळात लोकप्रतिनिधी गर्भश्रीमंताचे जावू द्या, पण सर्वसामान्य जनता गोरगरीब कामगार मजूराकडे कसल्याच गरजा भागविण्याएवढ्या सुविधा नसताना अशांनी लॉकडाउन मध्ये महिना दिडमहिना कोंडवून घेणे, सोपे नाही, त्यांच्या समस्यांचे निराकारण करुन सर्वच हाताना काम देवून अशा या पडत्याकाळात कुटूंबाना अन्न धान्यासह गरजू वस्तू पुरविणे आपले कर्तव्य ठरते असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर संवाद साधताना व्यक्त केले.
आलेल्या संकटाशी मुकाबला करताना संशयम जिद्द व शिस्तीने कोविड विषाणूचे गांभीर्य लक्षात घेवून लॉकडाउनचे सर्वानी पालन करणे गरजेचे आहे, पंरतू इतरापेक्षा तळागळातील उपेक्षीत समाज बांधवाकडून होणारे लॉकडाउनचे पालन महत्वाचे वाटते. यासाठी तुम्ही आम्ही सर्वजन मिळून नव्या बदलाला सामोरे जावू आणि ते स्विकारु असे अहवान ही सुप्रिया सुळे यांनी केले.