कोरोना नसलेल्या रुग्णावर स्वाईन फ्ल्यूचे सावट
नागपूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः नागपूर शहर व परिसराला कोरोना कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाने भयभित केलेले असतानाच राज्यावर अन्भिज्ञ अशा सारी या रोगासह स्वाईनफ्ल्यूचे संकट गोंगारत असल्याचे चित्र दिसते आहे. नागपूर येथे पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी केली गेली. व तो निगेटीव्ह आला. नंतर त्या रुग्णासह स्वाईनफ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी विनाविलंब संशोधन समिती गठीत केली गेली. पंरतू शासनाने ती समितीच तासभरातच रद्द ठरविली गेली. आणि शासकीय आरोग्य अधिकार्यासह इतर अधिकार्यांची समिती गठित केली गेल्याने कोरोनाग्रस्त रोग किंवा स्वाईनफ्ल्यू या रोगाची चिकित्सा करणे अवघड जात असून कोरोनाग्रस्त रोगावर उपचार करणारे पथक वेगळे, आणि सारी व स्वाईनफ्ल्यू रोगावर उपचार करणारे वेगळे वैद्यकीय पथक असावे त्यातून योग्य ती तपासणी करता येईल अशी माहिती डॉ. अनुप मरार यांनी दिली.
कोरोना कोविडची नागपूर शहरात लागन झाल्यापासून शासकीय वैद्यकीय मेडीकल रुग्णालय व मेयो रुग्णालयात कोरोनाग्रस्तावर उपचार चालू असून नागपूर महानगरपालिकेचे सहकार्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध असून नागपूर मनपाचे आयूक्त तुकाराम मुंडे तत्पर सेवा देत असून कोविड १९ वर नियंत्रण येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून काटेकोर लॉकडाउनचे पालन व्हावे यासाठी मनपा प्रशासन, जिल्हाप्रशासन, पोलीस यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे ही सर्वत्र बोलले जाते आहे.