ही कसली सकारात्मकता म्हणायची
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः सार्या गजगासह भारतालाही कोरोना कोविडने घेरलेले आहे. त्यावर तातडीचे नियोजन उपचारासाठीच्या योजना वैद्यकीय तज्ञाचे मत, जाणून घेण्यापूर्वीच १९ मार्चला जनता कर्फ्यू, २४ मार्चला ताळेबंदी, लागू करुन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब कामगारांना कोंडवून ठेवले. आणि मग राज्यानां सुचना आणि जनतेला अहवान करुन कोरोनावर मात करीत आहोत म्हणून घंटा नाद करणे, मेनबत्ती पेटवून अकार्यक्षमतेवर पांघरुन घालून आजही कसल्याही सोयीसुविधाविना सर्वसामान्य जनता जिव मुठित घेवून जगत असताना भाजपाचे माधव भंडारी म्हणात की, मनोबल वाढवीणारी सकारात्मकता म्हणून मोदी सरकारची पाठ थोडपटतात. ही सकली सकारात्मका म्हणायची अशी खिल्ली कॉंग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी उडवीली आहे.
कोरोना कोविडचा पाडाव करणेसाठी देशातल्या सर्वच मुख्यमंत्री, जाणकार व सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन व त्यात भरडल्या जाणार्या वर्गसमुहाची सोय करुनच लॉकडाउनचा निर्णय घेणे, उचित असताना प्रधान मंत्री मोदी यांच्या लॉकडाउनमुळे गोरगरीब कामगार मजूरांचे बेहाल होत असून अनेकजन भुकेने तडफडत आहेत. तरी कोणी सरकारी छावणीत अडकून पडलेत. तर कोणी आई, वडील, पत्नीच्या आठवणीने व्याकून होवून मृत्यूला कवठाळत आहेत. तरी ही केवळ सुचना, आदेश, देवून व त्याचे पालन न केल्यास नागरीकाना दंड व खटल्याची भिती घालून देशात एकहाती बहुमताचे हुकमी सरकार प्रधान मंत्री नरेंद्र मोदी चालवित असून अशाने देशात शांतता व सुव्यवस्था कशी नांदणार आणि निरोगी निकोप वातावरण निर्मिती कशी काय होणार त्यासाठी जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करुन रचनात्मक विकासाचे कार्य करणे गरजेचे असताना केवळ हुकूम देवून कोरोना मुक्तिच्या लढाईत सहभागी होण्याचे अहवान करुन कोविड हद्दपार होवू शकत नाही, त्यावर लॉकडाउन पर्याय ठरू शकत नाही, असे स्पष्ट करुन भाजपाची हि कसली सकारात्मक म्हणायी असे ही मत जुन्नरकर यांनी व्यक्त केले आहे.