स्थलांतरीत कामगारांसाठी दिशादर्शक पर्याय

स्थलांतरीत कामगारांसाठी दिशादर्शक पर्याय


दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडच्या विषारी संसर्गरोगामुळे देशभर लॉकडाउन  जारी करण्यात आले आहे.  देशभरातील उद्योग धंदे, कारखाने, व वेगवेगळ्या वस्तू निर्मिच्या मिल्स, बंद पडल्यामूळे बेकाराची संख्या वाढते आहे.  कामगार मजूर कामाविना लॉकडाउन मध्ये अडकल्यामूळे त्यांचे बेहाल होत आहेत.  पंरतू असंघटीत कामगार नियमीत असलेले कामगार आणि मजूर यांचे काम बंद पडल्यामूळे त्यांची उपासमार होत आहे.  त्यासाठी कामाविना आहे त्या ठिकाणी रहाने परवडत नसल्यामुळे अनेक कामगार मजूर त्याच्या त्याच्या गावी परराज्यात जाणे किंवा असेल त्या ठिकाणी कामावर राहाण्यासाठीचे दिशादर्शक पर्याय आणि उपाय योजनासाठी केंद्रिय पातळीवरील मंत्री गटाची बैठक घेवून तीत स्थलांतरीत कामगार व मजूरासाठी दिशादर्शक पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला असून केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घेतला असून तशी माहिती ही राजनाथ सिंह यांनीच बैठकी नंतर पत्रकाराना दिली.  
 राज्या राज्यातून कामगारांची ने आन करण्यासाठी आणि त्या कामगाराना आपापल्या गावी पोहंचते करण्यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, वैगेरे राज्य सरकारने तयारी दर्शवली असून इतर राज्यानीही पुढाकार घेतल्यास कामगार मजूरांचा त्यांच्या त्याच्या गांवी जाण्यासाठीचा प्रश्‍न मिटू शकतो किंवा आजघडीला जी उद्योग धंदे, कारखाने, चालू होतील त्या त्या चालकानी कामगार मजूरांच्या राहाण्याची व्यवस्था केली तरी प्रश्‍नाचे निराकारण होते, यासाठी खबरदारी व जबाबदारी घेवूनच अमलबजावणी करता येईल ती लवकरच पुर्णत्वास येईल असे ही सुतोवाच केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या