कोरोनाग्रस्त यादीतून लातूरचे नाव वगळावे
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः सुरवातीपासूनच लातूर शहर व जिल्हा कोरोना कोविड मुक्त आहे. पंरतू बाहेरच्या लोकांनी डाग लावला, ते सगळेच रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. पंरतू लातूरचे नांव कोरोना ग्रस्ताच्या यादीच आहे ते वगळावे अशी संतापजनक मागणी लातूरकरातून व्यक्त होताना दिसते आहे. लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केवळ सुचना व अहवाने करीत आहेत, मात्र जनतेने लॉकडाउनचे पालन केल्यानेच लातूर शहर व जिल्हा कोरोना मुक्त आहे, व राहाणार आहे, त्यासाठी कोणीही श्रेय लाटण्याचे प्रयत्न करु नये अशी विनंती लातूरचे नागरीक करीत असल्याची चर्चा होताना दिसते आहे.
तद्ववतच केंद्र सरकारकडून मोफत वाटप होणार तांदूळ स्वस्त धान्य दुकाना मार्फत एक दोन दिवस रांगा लावून वाटप करण्यात आले. ते ही कमीजास्त प्रमाणात वाटप करुन केवळ तो देखावाच असावा असे चित्र उभा केले गेले. पंरतू आजघडीला ही शासकीय पुरवठा विभाग का केवळ वृत्तपत्रातून माहिती व सुविधा जाहिर करण्यातच व्यस्त असून प्रत्येक्षात पाहणी न करताच बडेजाव पणा दाखवित असल्याची चर्चा सर्वत्र होत असून मोफत अन्न धान्य वाटप हा देखावाच असून परिस्थिती जैसे थीच असल्याची अवस्था निर्माण झाल्याचे दिसते आहे.